- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महायुतीच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीचा मोठा फायदा होत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून महायुतीचे सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन, आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव येथे महिलांचा भव्य मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार अश्विनी जगताप यांनी महिलावर्गाला संबोधित करत मार्गदर्शन…
गोरखपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेल्या 25व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर रोइंग स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना विद्यापीठाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. विद्यापीठाच्या कार्तिक कांबळे, प्रथमेश कांदे, श्रेयस गर्जे व वैभव लाड यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना “बॉईज फोर” या प्रकारात सुवर्णपदकाला गवसनी घातली. स्पर्धेत देशभरातील एकूण 19 राज्यसंघांनी सहभाग नोंदवला होता. या सुवर्णपदकानंतर पारितोषिक वितरण समारंभात त्यांचा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करंडक, बक्षिस व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कु.कार्तिक अंगद कांबळे (वय-14) डाॅ.विश्वनाथ कराड एमआयटी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील राजकारणात आज मोठा ट्विस्ट आला. पिंपरी राखीव मतदारसंघातील महायुतीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राजकीय मुत्सद्देगिरीने सर्व विरोधकांची मनधरणी केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बनसोडे यांच्या विजयासाठी वज्रमूठ करण्यात आली. दरम्यान, युवा नेते पार्थ पवार यांनी गुरुवारी तब्बल दोन तास पिंपरी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी यशस्वी शिष्टाई केली आणि आमदार बनसोडे यांचा विजय दृष्टीक्षेपात आला. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवाणी यांना आज सकाळी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यांच्या समवेत योगेश बहल, डब्बू आसवाणी, काळुराम पवार, चेतन घुले, प्रसाद शेट्टी, भाजपचे…
विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामस्थ, सोसायटीधारकांची वज्रमूठ महेश लांडगेंच्या पुढाकाराने झालेला विकास आम्ही विसरणार नाही..! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून च-होलीतील समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना येथे मते मागायला येण्याचा नैतिक अधिकारही नाही. महेश लांडगे आमदार झाल्यापासून च-होलीतील विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य च-होलीतून देण्याचा निर्धार च-होलीकरांनी केला आहे. महेश लांडगे हे मागील दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा आमदार होतील, असा विश्वास च-होलीकरांनी व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी च-होली परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमदार लांडगे यांनी दत्तनगर, काळीभिंत, वडमुखवाडी,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील महत्वाचे स्थान असलेल्या दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद यांनी गुरुवारी (ता. १४) सांत्वन भेट घेतली. शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनचे त्यांचे घनिष्ठ मित्र व सहकारी असलेल्या नानासाहेब शितोळे यांच्या पत्नीचे गेल्या महिन्यात २२ ऑक्टोंबर रोजी अनिता उर्फ नानी नानासाहेब शितोळे यांची निधन झाले होेते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतही पवार यांनी जुने ऋनाणुबंध जपत शितोळे कुटुंबियांच्या घरी भेट देवून सांत्वन केले. यावेळी नानासाहेब यांचे चिरंजीव अजय शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मुलगी आरती राव, सुना व नातवंडे यांच्यासह राहुल कलाटे देखील…
– जागोजागी पुष्पवृष्टी, नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी गुरुवारी (ता. १४) तब्बल तीन तास ‘रोड शो’ केला. सांगवीतून सुरु होऊन वाल्हेकर वाडी इथे समाप्त झालेल्या या रोड शोला चिंचवड वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २० वर्षानंतर आणि चिंचवडच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवारांनी रोड शो केला. त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची राजकीय मुसंडी हा दिवसभर चर्चेचा विषय राहिला. रोड-शोचे चौका-चौकात जल्लोषात स्वागत झाले. यात्रे दरम्यान शरद पवार आणि उमेदवार राहुल कलाटे सर्वांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली- जाधववाडी परिसरात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले. मोठे उद्यान विकसित झाले. मुबलक पाणी मिळत आहे. विकासाच्या रथाला ‘ब्रेक’ लागू नये, विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आम्ही महेश लांडगे यांच्यासोबत आहोत. त्यांना विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार जाधववाडीकरांनी केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमदार लांडगे यांनी सेकटर 16, राजे शिवाजीनगर, विवेकनगर, पंतनगर, जाधववाडी या या परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि सोसायटीधारक,…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात दहशत गुंडगिरी दादागिरी दडपशाही भ्रष्टाचार यांचे रान बोकाळले आहे. या दहशतीला तसेच दहशत पसरविणाऱ्यांना मुठमाती देण्यासाठी पुन्हा एकदा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांतीची वेळ येऊन ठेपली आहे. येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मी उभी असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला निवडून देऊन ही दादागिरी दहशत संपविण्यासाठी मी उचललेल्या पावलाला बळकटी देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी केले. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी विधानसभा मतदार संघातील…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज चिंचवड परिसरामध्ये आपल्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते. या प्रचारफेरी दरम्यान त्या चिंचवड स्टेशन परिसरात आल्या त्यावेळी काही चिमुकली मुले तिथे खेळताना त्यांनी पाहिली. आपला प्रचार विसरून सुलक्षणा शिलवंत या त्या बालचमुंमध्ये मिसळून गेल्या क्षणभर आपला प्रचार गेली काही दिवस चालू असलेल्या पदयात्रामुळे झालेली दमछाक हे सारे त्या विसरून गेल्या. आज 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून देशात साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी या बालकांमध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यांना खाऊ देखील वाटला. यावेळी अनेक मुलांची…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे गुरुवारी इंद्रायणीनगर परिसरात चिमुकल्यांमध्ये रमले. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत असताना काही चिमुकल्यांनी अजित गव्हाणे यांचे लक्ष वेधले. या मुलांशी गप्पा मारत त्यांच्या पालकांना आगामी काळात महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच येथील शिक्षण संस्था अद्यावत करण्यावर भर देणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बालाजी नगर इंद्रायणी नगर तसेच आसपासच्या परिसरामध्ये प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
