विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली- जाधववाडी परिसरात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले. मोठे उद्यान विकसित झाले. मुबलक पाणी मिळत आहे. विकासाच्या रथाला ‘ब्रेक’ लागू नये, विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आम्ही महेश लांडगे यांच्यासोबत आहोत. त्यांना विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार जाधववाडीकरांनी केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमदार लांडगे यांनी सेकटर 16, राजे शिवाजीनगर, विवेकनगर, पंतनगर, जाधववाडी या
या परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि सोसायटीधारक, ज्येष्ठ नागरिक आणि टाटा मोर्टर्सचे काही कर्मचारीही उपस्थित होते. मध्यमवर्गीय, उच्चशिक्षित, आयटीयनन्स या सर्वांनी महेश लांडगे यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
समाविष्ट झाल्यापासून जाधववाडी विकासापासून वंचीत होती. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर उद्यान, शाळा, भाजी मंडई, क्रीडांगण अशी विविध आरक्षणे ताब्यात घेतली. विकसित केली. त्यामुळे जाधववाडीला शहराचे रूप आले. जाधववाडी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) होत आहे. त्यामुळे मुलांना जवळच शिक्षणाची सोय होणार आहे. न्यायसंकुल जाधववाडीतच होत आहे. पोलीस आयुक्तालय येथेच होत आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून जाधववाडीकडे पाहिले जात आहे. जाधववाडीची ही ओळख केवळ आमदार महेश लांडगे यांच्यामुळे झाली आहे. विकासाचा रथ असाच पुढे कायम ठेवण्यासाठी आम्ही आमदार लांडगे यांच्यासोबत आहोत. त्यांना विजयी मताधिक्य या भागातून देण्याची ग्वाही नागरिकांनी दिली.
जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठामुळे टाळगाव चिखली आणि पिंपरी-चिंचवड शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. संतांच्या या पुण्यभूमीमध्ये शाश्वत विकासासोबत एक वैचारिक पिढी घडवण्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम करण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात समाविष्ट गावांच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करणार आहे. विकासाचे रोल मॉडेल शहर व्हावे, अशी माझी भावना आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.