उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बनसोडे यांच्या विजयासाठी वज्रमूठ, शहरातील राजकारणात मोठा ट्विस्ट
दरम्यान, युवा नेते पार्थ पवार यांनी गुरुवारी तब्बल दोन तास पिंपरी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी यशस्वी शिष्टाई केली आणि आमदार बनसोडे यांचा विजय दृष्टीक्षेपात आला.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवाणी यांना आज सकाळी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यांच्या समवेत योगेश बहल, डब्बू आसवाणी, काळुराम पवार, चेतन घुले, प्रसाद शेट्टी, भाजपचे शितल शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत स्वतः अजित पवार यांनी आसवाणी बंधुंना ग्वाही दिली.
योगेश बहल ठरणार ‘‘किंगमेकर’’
पार्थ पवार यांचे मतदार संघात विशेष लक्ष…
दरम्यान, पार्थ पवार यांनी सर्व सूत्र हातात घेतली आणि एका एकाची समजूत काढली. त्यानंतर बहल यांच्यासह काळुराम पवार, जितेंद्र ननावरे यांनी माघार घेतली. पार्थ पवार हे सलग आठवडाभर शहरात तळ ठोकून आहेत. गुरुवारी त्यांनी आसवाणी यांच्या निवासस्थानी स्वतंत्रपणे भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही माघार घ्या आणि बनसोडे यांच्या बरोबर सक्रीय होण्यासाठी आग्रह केला. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पिंपरी कॅम्पमधून आमदार बनसोडे यांच्या निर्णायक आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.