- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
लिंक रोड, चिंचवड स्टेशन, आनंदनगर येथे आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 16) लिंक रोड चिंचवड, आनंदनगर, गवळी वाडा येथे प्रचार फेरी काढली. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा आमदार होतील, असा सूर आवळला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून महिला आणि ज्येष्ठांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आशीर्वाद दिले. चिंचवड स्टेशन येथील गावडे पार्क, गावडे कॉलनी, भोईर कॉलनी, सुदर्शन नगर, गोलांडे कॉलनी, गणेश नगर, श्रीधर नगर, गोलांडे इस्टेट, गावडे नगर, लक्ष्मी…
स्व. लक्ष्मण जगताप यांच्या दूरदर्शी विचारांमुळे न्यायप्रणालीचा पाया मजबूत – ॲड. गोरखनाथ झोळ चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील वकिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि न्यायप्रणाली अधिक सुसंगत बनवावी, यासाठी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिखली येथे भव्य न्यायालय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळेच न्यायप्रणालीसाठी एक मजबूत पाया निर्माण झाला असून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड कायदा आघाडी व संविधान विधी सेवा मंचचे सर्व वकील सदस्य एकजुटीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे प्रतिपादन कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ यांनी केले. संविधान विधी सेवा मंचच्या…
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्ताच्या आराखड्याबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी आज आढावा घेतला. चिंचवड क्षेत्रात मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्या दृष्टीने थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील बापुजी बुवा सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीस चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, सेक्टर ऑफिसर्स समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, आचारसंहिता कक्षाचे समन्वय अधिकारी राजेंद्र डुंबरे, पिंपरी चिंचवड…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली, मोशी या पट्ट्यामध्ये दिवंगत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा निंदनीय प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. मात्र येथील सुज्ञ जनता भाजपा आमदारांच्या भूलथापांना बळी पडली नाही. त्यामुळेच विरोधकांना या भागात उपमुख्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणावे लागले हीच आमदारांच्या अपयशाची पोचपावती असल्याची खरमरीत टीका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोशी, चिखली, साने वस्ती मोरे वस्ती या समाविष्ट भागांचा…
डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना निवडून देण्याचे केले आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रखर समीक्षक आणि वक्ते आहेत. त्यांनी प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांवर नेमकेपणाने हल्लाबोल केला. त्यांनी महायुतीवर टीका करताना राजकीय एकजुटीचा अभाव, अनागोंदी कारभार, तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यात असलेले अपयश यावर जोरदार प्रहार केला शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न: महायुती सरकार या मुद्द्यांवर ठोस पावले उचलत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.राजकीय अस्थिरता: महायुतीमधील घटक पक्षांमध्ये असलेली अंतर्गत फूट आणि निर्णय घेण्यास होणारा विलंब यामुळे राज्याचे वाटोळे झाले आहे. विरोधकांवर दबाव आणणे, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर कारवाई किंवा दबाव आणणे यामध्येच महायुती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा सुर आवळला. दापोडी, देवीलिंक सोसायटी, रमाबाई नगर पिंपरी आणि भाजी मंडई येथे या कोपरा सभा झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अनुसूचित जाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, शहराध्यक्ष संजय औसरमल, दिपक मेवानी, लीडकॉन माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, माई काटे, राजू बनसोडे, कार्याध्यक्ष मीरा कांबळे, यश बोथ, विनय शिंदे, उपाध्यक्ष कुमार कांबळे, पिंपरी विधानसभा…
प्राधिकरण निगडी भागात अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रचारफेरी दरम्यान दिली. लिफ्टच्या सुविधेसह दोन मजली विरंगुळा केंद्र ही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी निगडी प्राधिकरण परिसरात प्रचार फेरी काढली. काही ठिकाणी पायी चालत तर काही ठिकाणी रथातून ही प्रचार फेरी निघाली. यावेळी प्राधिकरण परिसरातील भाजपसह महायुतीच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपा महायुती सरकारने राजस्थानमध्ये जाहीरनाम्यातील 50 टक्के आश्वासने 11 महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही भाजप महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि राज्यातील विकासाचा वेग वाढले, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीच्या विकासासाठी भाजपचे शिलेदार विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांना प्रचंड मतांनी विजयी करत त्यांची हॅट्रिक पूर्ण करा असे आवाहन देखील त्यांनी राजस्थानी बांधवांना केले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्यासोबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी भजनलाल शर्मा यांनी दि. 20 नोव्हेंबर रोजी…
फुगेवाडी ग्रामस्थांचा सुलक्षणा शीलवंत यांना एकमुखी पाठिंबा फुगेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विठ्ठल मंदिरात आयोजित काल्याच्या कार्यक्रमातच तुतारीचा जयघोष करीत फुगेवाडीतील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी चिंचवड शहर हे संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा वारसा चालवणारे शहर म्हणून ओळखले जाते. गेली पंधरा दिवस पिंपरी चिंचवड शहरात विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात काकड आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी विधानसभा मतदार संघातील सर्व काकड आरत्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी उपस्थिती लावली व स्वतःही हरिभक्तित तल्लीन झाल्या होत्या.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी-काळेवाडी परिसरातील आदर्शमाता, सौ. बेबीताई बाबासाहेब तापकीर यांचे मंगळवार दि. १२-११-२०२४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. तापकीर कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेती व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्याची आवड त्यांनी जपली. शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान होते. पंचक्रोशीत त्या “ताई” म्हणून परिचित होत्या. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. बाबासाहेब तापकीर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बेबीज् इंग्लिश हायस्कूल चे अध्यक्ष हेमंत तापकीर व सामाजिक कार्यकर्ते हरेश तापकीर त्यांचे पुत्र होत.
