राजस्थानवासी भाजपच्या नेहमीच पाठीशी; महेश लांडगे यांची हॅट्रिक पूर्ण करणार – राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे भोसरीतील राजस्थानी बांधवांना आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपा महायुती सरकारने राजस्थानमध्ये जाहीरनाम्यातील 50 टक्के आश्वासने 11 महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही भाजप महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि राज्यातील विकासाचा वेग वाढले, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीच्या विकासासाठी भाजपचे शिलेदार विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांना प्रचंड मतांनी विजयी करत त्यांची हॅट्रिक पूर्ण करा असे आवाहन देखील त्यांनी राजस्थानी बांधवांना केले.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्यासोबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी भजनलाल शर्मा यांनी दि. 20 नोव्हेंबर रोजी आमदार महेश लांडगे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन राजस्थानी बांधवांना केले. यावेळी प्रभारी प्रदीपसिंह जडेजा, विस्तारक दीपक रजपूत, समन्वयक विजय फुगे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना, मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखाली भारत संपूर्ण जगात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे”. गरीब कल्याणकारी योजना, सीमा सुरक्षा, दहशतवादाशी सामना आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या कामाचे उल्लेख सर्व स्तरीय कौतुक होत आहे.
काँग्रेसवर निशाणा साधताना मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, “राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राजवटीत तरुणांची फक्त फसवणूक होत होती. भाजप सरकार येताच आम्ही पेपर लीक प्रकरणांच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. गुंड आणि माफियांचा नायनाट करण्यासाठी अँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना केली”. भाजपा सरकारने राजस्थानमधील जाहीरनाम्यातील 50 टक्के आश्वासने 11 महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही भाजप महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि राज्यातील विकासाचा वेग वाढले, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.
राजस्थानी बांधव आमदार लांडगे यांच्या पाठीशी…
मुख्यमंत्री शर्मा यांनी राजस्थानी समाजाची भूमिका आणि त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी अभिमान असल्याचे सांगितले. प्रत्येक राजस्थानी बांधवांना राष्ट्रवाद हा सर्वोच्च आहे. राष्ट्रासाठी हा समाज नेहमीच समर्पित असतो. महाराष्ट्र आणि राजस्थान दोन्ही स्वाभिमानाच्या भूमी आहेत. जिथे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे महान योद्धे जन्माला आले, असे म्हटले. राजस्थानी समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे त्यामुळे आमदार महेश लांडगे यांना राजस्थानी बांधव बहुमतांनी विजयी करतील असा विश्वास देखील भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला.
राजस्थानी बांधव नेहमीच भाजपासाठी सकारात्मक राहिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये राजस्थानी बांधवांची संख्या मोठी आहे. शहराच्या प्रगतीमध्ये सर्वसमाज घटकांचे योगदान आहे. राजस्थानी बांधवांचा समाजहित म्हणून पुढाकार असतो. कोरोना काळामध्ये या बांधवांच्या मदतीने आम्ही शहरातील प्रत्येकाला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. राष्ट्र-समाज हित प्रथम पाहणाऱ्या या समाजाच्या माध्यमातून आणि सहकार्याने निश्चितपणे विजयाची हॅट्रिक होणार आहे.
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.