Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती  दिनानिमित्त दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी  पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. .         २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त  तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून सकाळी.१०.४५ वाजता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती  दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सकाळी ११.१५ वाजता महात्मा…

Read More

वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने झाला गौरव आषाढी वारीदरम्यान पवार यांच्याकडून वारकऱ्यांसाठी उल्लेखनीय सेवा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर वारकरी सेवा संघ व समस्त ग्रामस्थ सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे व जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्या निमित्त सांगवी येथे गाथा चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र अरुण पवार यांना वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. निरुपणकार ह. भ. प. सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सांगवी गावातील मारूती मंदीरात गाथा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरू नगर पिंपरी न्यायालयात पुरुष बार रूममध्ये पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही प्रमुख व्याख्याते व प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सर्व महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करून व तसेच प्रमुख व्याख्याते माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी संविधानाची प्रस्ताविका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान दिनाचे औचित्य साधून प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार व व्याख्याते ॲड.जयदेव गायकवाड यांची उपस्थिती लाभली तसेच गायकवाड साहेबांनी भारताचे संविधान या विषयावर मार्मिकपणे विश्लेषण साधून सविस्तर असे भारताचे संविधान कसे सर्वोच्च आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डोझीच्या साहाय्याने आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना हृदयाचे ठोके,रक्तदाब,एसपीओ2 पातळी,तापमान आणि ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींवर दुरस्तपणे देखरेख ठेवता येईल.डोझीच्या अर्ली वॉर्निंग सिस्टिम (ईडब्ल्यूएस)च्या सहाय्याने या महत्त्वाच्या बाबींचे कल लक्षात घेऊन मागोवा ठेवतो येतो आणि रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीत बिघाड झाल्यास आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सूचना मिळून योग्य वेळेत गरजेनुसार हस्तक्षेप करता येतो.डोझी तर्फे एआय आधारित बॅलिस्टोकार्डिओग्राफी (बीसीजी) चा वापर केला जातो,ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस मॉनिटरींग शक्य होते.डोझीच्या तंत्रज्ञानाला पेटंट प्राप्त झाले असून हे तंत्रज्ञान भारतात विकसित केले गेले आहे.या अभिनव तंत्रज्ञानाचा रूग्ण सुरक्षिततेवर,वैद्यकीय परिणामांवर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव पडतो. संचेती समुहाचा रूग्णकेंद्रित दृष्टीकोन आणि स्मार्ट आणि शाश्वत आरोग्य…

Read More

श्रींचे पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे ३ लाख भाविकांनी हरिनाम गाजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद करीत साजरी केली. आळंदी परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. आळंदी मंदिरात पहाट पूजे मंगलमय वातावरण धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. रांगोळीचे लक्षवेधी…

Read More

सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यावेळी संविधान मस्तकाला लावून जगताप यांनी अभिवादन केले. कार्यक्रमास ,माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, उज्वला ढोरे, सुषमा तनपुरे, प्रशांत शितोळे, दिलीप तनपुरे, सागर अंगोळकर, दत्तात्रय यनपुरे, कांता भाऊ कांबळे, सोनाली जम,…

Read More

संविधान अमृत महोत्सव निमित्ताने कामगारांकडून प्रस्ताविकेचे वाचन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय एकात्मकेला एकात्मतेसाठी मौलिक अधिकार दिलेले आहेत यात संचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, जमाव स्वातंत्र्य,निवास स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, मालमत्ता व व्यवसाय स्वातंत्र्य यामुळेच स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या देशाची अभिमानास्पद प्रगती आहे संविधानातील राष्ट्राला अभिप्रेत असलेली मानवता महत्त्वाची आहे ती जपली पाहिजे असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, बांधकाम कामगार समन्वय समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज शहरातील विविध ठिकाणी कामगारांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-  पिंपरी चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी  भोसरीच्या विजयाचा जल्लोष मध्यप्रदेश महेश्वर याठिकाणी  साजरा केला. भोसरी विधानसभेत तिसऱ्यांदा सर्वधिक मताधिक्याने निवडून आले. त्यावेळी सर्व कार्यकर्ते चिखली गावातील 750 यात्रेकरूंना घेऊन उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर येथे धार्मिक यात्रेला गेले होते. 20  नोव्हेंबला मतदान करून यात्रेस निघालो. 23 नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत महेश्वर याठिकाणी होतो. हॅट्रिकची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी अभिनंदनचे फ्लेक्स  आणले होते. आमदार महेश लांडगे यांची हॅट्रिक होताच सर्व यात्रे करुनी तसेच जितूभाऊ यादव मित्र परिवाराच्या वतीने जल्लोष केला.

Read More

भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती – शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक – दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत.  त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची ‘हॅट्रिक’ केली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्र परिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रतिवर्षी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “हिंदू हाच देशाचा केंद्रबिंदू असून हिंदुत्व समाजाच्या केंद्रस्थानी आहे!” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड जिल्हा – विशेष संपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद सेतू या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद परांडे बोलत होते. प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, इस्कॉनचे गोपीदास प्रभू, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सम्पर्क प्रमुख श्रीकांत पोतनीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची…

Read More