पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशन आयोजित संविधान दिन पिंपरी कोर्टात साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरू नगर पिंपरी न्यायालयात पुरुष बार रूममध्ये पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही प्रमुख व्याख्याते व प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सर्व महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करून व तसेच प्रमुख व्याख्याते माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी संविधानाची प्रस्ताविका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान दिनाचे औचित्य साधून प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार व व्याख्याते ॲड.जयदेव गायकवाड यांची उपस्थिती लाभली तसेच गायकवाड साहेबांनी भारताचे संविधान या विषयावर मार्मिकपणे विश्लेषण साधून सविस्तर असे भारताचे संविधान कसे सर्वोच्च आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र प्रयत्न करून भारताचे सर्वोच्च संविधान या देशाला अर्पण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष, समता, न्याय,बंधुता या सूत्राची सांगड घालून या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोच्च असे भारतीय संविधान अर्पण केले व भारतीय संविधान आपल्याला एकसंध ठेवते अशा महामानवाला कोटी कोटी वंदन करून अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात दिनांक २६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष ॲड.सुनील कडुसकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पि.चि.ॲड.असो.चे मा.अध्यक्ष ॲड.अशोकपाल शर्मा त्याचबरोबर मोठ्या संख्येने वकील वर्ग हजर होता.मा.अध्यक्ष ॲड.नाना रसाळ व मा. अध्यक्ष ॲड.प्रमिला गाडे, मा.अध्यक्ष सुदाम साने व मा.उपाध्यक्ष प्रतीक जगताप, मा. उपाध्यक्ष गौरव वाळुंज,मा.उपाध्यक्ष गोरख कुंभार ज्येष्ठ विविध ॲड.बी.के कांबळे व ॲड.नारायण थोरात व ॲड.संभाजी वाघमारे व ॲड.राजरतन जाधव ॲड.प्रवीण जगताप ॲड.अतुल कांबळे ॲड.पल्लवी विघ्णे, ॲड.तेजस चौरे ॲड.पल्लवी कुऱ्हाडे व सरकारी वकील वाळके, ॲड.घोरपडे, ॲड.प्रताप कडूस, ॲड.नितीन कांबळे, ॲड.लबडे, ॲड.मिलिंद कांबळे, ॲड.सुनील माने, ॲड.हास्यसम्राट प्रताप साबळे, ॲड.मुकुंद ओव्हाळ , ॲड.अधिक चरेगावकर, ॲड.मुस्ताफिज शेख ॲड.जयेश वाकचौरे ॲड .अजय शर्मा ॲड.विक्टर पिंटू ॲड.राजेश रणपिसे ॲड.कुलदीप बकाल ॲड.राजेश पुरोहित, अनिल पवार, अजित खराडे,सागर आडागळे, महिंद्रा दांडगे, महेश जानकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनचें नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष अजय यादव,सचिव संदीप तापकीर, महिला सचिव संगीता कुशलकर, सहसचिव पद्मावती पाटील, खजिनदार विशाल पोळ, हिशोब तपासणीस प्रेरणा चंदानी,सदस्य विजय धोंडीराम धोंडे, अक्षय चौधरी, आरती कुलकर्णी, पोर्णिमा मोहिते, रुपाली पवार,सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.विशाल पोळ यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ॲड.संगीता कुशलकर यांनी केले.










