आमदार महेश लांडगे यांचे वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही!


भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती
– शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक
– दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत. त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची ‘हॅट्रिक’ केली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्र परिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिवर्षी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमदार लांडगे यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जातो. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर भव्य अभिष्ठचिंतन सोहळा होतो. मात्र, यावर्षी आमदार लांडगे यांचे सासरे हिरामण गोडसे यांचे निधन झाले आहे. शिवांजली सखी मंचच्या सर्वेसर्वा पुजा लांडगे यांचे ते वडील होत. त्यामुळे लांडगे व गोडसे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
तसेच, आमदार महेश लांडगे यांचा अत्यंत विश्वासू आणि जुना सहकारी दिपक पवार यांचे आकस्मिक निधन झाले आहे. निगडी येथील दिपक नायर याचे हृदयविकाराच्या झटक्याने ऐन निवडणुकीच्या काळात निधन झाले आहे. त्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही.
आमदार महेश लांडगे यांचे सासरे गोडसे आणि लांडगे कुटुंबियांतील मार्गदर्शक स्व. हिरामण गोडसे यांचे नुकतेच निधन झाले आहे. तसेच, आमदार लांडगे यांचे दोन सहकारी स्व. दिपक पवार आणि स्व. दिपक नायर यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांचा वाढदिवस आनंदोत्सव किंवा अभिष्ठचिंतन सोहळा होणार नाही. सर्व पक्षीय सहकारी, मित्र परिवार यांनी शुभेच्छा कार्यक्रम ठेवू नये, असे आवाहन करीत आहोत.
– संजय पटनी, मा. प्रसिद्धी प्रमुख, भाजपा.








