चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

वारकरी सेवा संघातर्फे वृक्षमित्र अरुण पवार यांचा सन्मान

Spread the love

वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने झाला गौरव

आषाढी वारीदरम्यान पवार यांच्याकडून वारकऱ्यांसाठी उल्लेखनीय सेवा

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर वारकरी सेवा संघ व समस्त ग्रामस्थ सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे व जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्या निमित्त सांगवी येथे गाथा चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र अरुण पवार यांना वारकरी सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

निरुपणकार ह. भ. प. सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सांगवी गावातील मारूती मंदीरात गाथा चिंतन संपन्न होणार आहे.

या गाथाचिंतनाचे तिसरे सत्र नुकतेच संपन्न झाले.

यावेळी वारकरी सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौरभ शिंदे,अशोक ढोरे (पाटील),बाळासाहेब शितोळे,पंढरीनाथ ढोरे,शिवाजी ढोरे,नागेश फुगे,राकेश काटे,रोहित घुले,गौरव ढोरे,विश्वनाथ सपकाळ,राजाभाऊ कड,करण सुरवसे,मंगेश कदम पंचक्रोशीतील अनेक जेष्ठ वारकरी व तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*अरूण पवार यांच्याकडून

वारकऱ्यांची निष्काम सेवा*

-ह.भ.प सचिन पवार

वृक्षमित्र अरुण पवार यांचे सामाजिक तसेच सांप्रदायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे.खासकरून दरवर्षी आषाढी वारीमध्ये त्यांच्याकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

पंढरपूरला जाताना अनेकजण वॉटर टँकर देतात परंतु वारीच्या परतीच्या वाटेवर अरुण पवार यांची सेवा घडते हे उल्लेखनीय आहे.
अरुण पवार यांनी आजपर्यंत 50 हजार झाडे लावून ती जगवली आहेत, एक लाख वर्ष वाटप करणे, पक्षी संवर्धन व संगोपन केले आहे. मराठवाडा बांधवांच्या समाजभवनसाठी स्वतःची दहा गुंठे जागा दान करण्याचे मोठे दातृत्व त्यांनी दाखविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button