- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीग (पुणे जिल्हा) आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने संरक्षण दलातील निवृत्ती वेतनधारकांसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक २८, आकुर्डी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी बँक ऑफ बडोदा पुणे विभागीय महाव्यवस्थापक कविता सिंह, उपव्यवस्थापक (व्यवसाय विकास) जयंत पट्टजोशी, विभागीय व्यवस्थापक शब्बीर मेहसानिया, संरक्षण विभाग बँकिंग सल्लागार निवृत्त ब्रिगेडियर डॉ. संजीव देवस्थळी, इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीगचे अध्यक्ष वाय. एस. महाडिक, सचिव डी. एच. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कविता सिंह यांनी आपल्या मनोगतातून, “दिवसरात्र दक्ष राहून आणि डोळ्यात तेल घालून प्रत्येक…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “युद्धखोर जगाला शांततेच्या संदेशाची गरज असून बौद्ध, महावीर आणि गांधींची भूमी हा संदेश देऊ शकते!” असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ज्ञानदीप विद्यालय, रूपीनगर, तळवडे येथे व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागप्रमुख डॉ. महेश देवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच कृषिभूषण सुदाम भोरे, रूपीनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर दळवी, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी विविध परिसरात पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबईल हिसकावने, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. तरी या परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभृ मोठ्या सोसायट्या आहेत त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात.त्यांना व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिंडी सोहळ्यातील जातीय विषमता संपवून समतेचा विचार जोपासणारा लढा उभारण्यात आला होता. त्याला यश आले आहे. संत रोहिदास आजा मेळा चोखामेळा या दिंड्या दलित दिंड्या घोड्याच्या घोड्याच्या पुढे आणि पालखी सोहळ्याच्या बाहेर चालत होत्या त्यांना घोड्याच्या पाठीमागे व पालखी सोहळ्यामध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहामुळे दलित दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये चालण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे आळंदीत माऊलीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक, वारकरी समतेचे विचार पुढे घेऊन जात आहे. समतेचा हा विचार तळागाळात रुजविण्यासाठी दिंडी साहेळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्याग्रहाचा पन्नासावा उत्साहात साजरा करणार असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील संत रोहिदास मठ व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरूनगर पिंपरी न्यायालयात वकील पुरुष रूममध्ये पुण्याचा शनिवार वाड्याला आग लावून पुरोहितांच्या छाताडावर पाय रोवून.. विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। असे छातीठोक सांगून शिक्षण आणि उद्धाराचा अध्याय बहुजनांचा घराघरात रचनारे क्रांतीबा महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र पूर्वक अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केली.पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन सन २०२४ व २०२५ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मागील वर्षातील सन २०२३-२०२४ च्या प्रथम महिला अध्यक्ष प्रमिला गाडे मॅडम…
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतली असल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. यामधील अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. मुकुंद ओव्हाळ तर सचिव पदाचे उमेदवार ॲड.…
नामदास महाराज यांची श्रींचे सोहळ्यात हृदयस्पर्शी कीर्तन आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी मंदिरात माऊली माऊली नामजयघोषात कीर्तन सेवा, पुष्पवृष्टी आणि घंटानाद, श्रींची आभूषणांसह सजलेल्या पूजेतील लक्षवेधी वैभवी रूप दर्शन, तसेच परंपरेने पहाट पूजा करून श्रींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत नामजयघोषात लाखो भाविकांचे उपस्थितीत परंपरेने साजरा झाला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. या वर्षी सोहळयास माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार विजय शिवतारे, खासदार संजय उर्फ बंडू जाधव, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पंढरपूर देवस्थान विश्वस्त ॲड. माधवीताई…
श्री विठ्ठल , ज्ञानोबा माऊली, तुकाराम नामजय घोषात श्रींचा रथोत्सव आज श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विना, टाळ, मृदंगाचा त्रिनादासह माऊली, माऊली, श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम नामजयघोष करीत बुधवारी ( दि. २७ ) भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माउलींचा वैभवी पुरातन सिसम लाकडी रथ या रथातून श्रींचा चांदीचा मुखवटा रथोत्सवासाठी पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथापरंपरांचे पालन करीत उत्साहात साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम हरी नामजयघोष भाविकांनी केला. भाविकांचे नामजय घोषात यावर्षी पुरातन रथ विद्युत रोषणाई आणि सुगंधित अत्तराने मढविलेला सजलेल्या रथात माऊलींची पूजा…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे जी. भोसलेपाटील आणि कार्यकारिणी द्वारे ॲड. सुशील मंचरकर यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. ॲड. संगीता परब, ॲड. शंकर पल्ले, ॲड. वैभव कल्याणकर यांची निवडणूक अधिकारी सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे; तसेच सदर निवडणूक ही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या नियमानुसार व त्यांनी नेमलेले निरीक्षक ॲड. श्रीकांत अगस्ते यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नेहरूनगर, पिंपरी न्यायालयात सकाळी १० ते सायंकाळी ०५:३० वाजता होणार आहे. यामध्ये पिंपरी – चिंचवड…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड. च्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उच्छाहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया बीएडच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थिनी शितल डुंबरे यांनी उद्देशिकाचे वाचन करून उपस्थित त्यांना शपथ दिली. संविधान दिनाचे उद्घाटन भारताच्या संविधानाचे पूजन डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनी प्रियंका श्रीवास्तव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विशद केली; तर कविता वाचन किरण पाटील या विद्यार्थिनीने केले. प्रमुख पाहुणे…
