पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचा पदग्रहण सोहळा संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरूनगर पिंपरी न्यायालयात वकील पुरुष रूममध्ये पुण्याचा शनिवार वाड्याला आग लावून पुरोहितांच्या छाताडावर पाय रोवून.. विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। असे छातीठोक सांगून शिक्षण आणि उद्धाराचा अध्याय बहुजनांचा घराघरात रचनारे क्रांतीबा महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र पूर्वक अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केली.पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन सन २०२४ व २०२५ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मागील वर्षातील सन २०२३-२०२४ च्या प्रथम महिला अध्यक्ष प्रमिला गाडे मॅडम व कार्यकारणीने पदभार नवनिर्वाचित कार्यकारिणीला सुपूर्द केला.



कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण मामा खरात तर प्रमुख उपस्थिती मा. उपाध्यक्ष प्रतीक जगताप हे होते. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनची सन २०२४-२०२५ सार्वत्रिक निवडणूक पार पडली सदर निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून मा. अध्यक्ष नारायण (नाना) रसाळ यांनी काम पाहिले नाना रसाळ यांनी सदरची निवडणूक कायदेशीरपणे शिस्तबद्ध नियोजनबद्ध घडवून आणली व निवड झालेल्या अधिकृत उमेदवाराची यादी जाहीर केली. निवडणूक अधिकारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख उपस्थिती मा.उपाध्यक्ष प्रतीक जगताप यांनी मागील सन २०२३- २०२४ च्या कार्यकारणीने केलेल्या कामकाजाचा उल्लेखनीय आढावा घेतला व नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी यांनी वकील हिताच्या बाजूने वर्षभरात काम करावे अशा कौतुकास्पद शुभेच्छा दिल्या. तसेच मागील वर्षाचे अध्यक्ष प्रमिला गाडे मॅडम यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा सांगितला. वकील हिताच्या दृष्टीने कामकाज केले. आरोग्य शिबीर घेतले नवीन कायद्याचे लेक्चर घेतले वकील वर्ग मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला वैतागून जातात या दृष्टीने वकील वर्गा मनोबल वाढवण्यासाठी एक दिवसीय सहल चे आयोजन केले अशा विविध गोष्टीवर प्रकाश टाकला.
तसेच मा.उपाध्यक्ष गोरख कुंभार यांनी वर्षभरात आलेल्या अडी अडचणी असताना त्यावर कशी मात केली याबाबत अधिक माहिती दिली.

नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी मागील वर्षाचे अध्यक्ष व कार्यकारणी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. व नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी यांना निवडणूक अधिकारी यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग शिनगारे यांनी आपण यापुढेही वकील हिताच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेऊन मागील वर्षीच्या कार्यकारणीच्या साथीने यावर्षीही कामकाज करू अशी ग्वाही दिली व शुभेच्छा स्वीकारल्या.
कार्यक्रमा वेळी उपस्थित मा.अध्यक्ष सुनील कडुसकर मा.अध्यक्ष किरण पवार मा.अध्यक्ष सुदाम साने, ज्येष्ठविधीतज्ञ ॲड.बी.क. कांबळे, ॲड.शशिकांत गावडे,ॲड. प्रताप कडुस,मा.उपाध्यक्ष ॲड.योगेश थांबा,ॲड.योगेश मळेवाडी,ॲड.तेजस चवरे, ॲड.पल्लवी कुऱ्हाडे,ॲड.सागर आडागळे सूर्या महेंद्र दांडगे अतुल कांबळे,अधिक चरेगावकर तुषार खरात घोलप,नारायण थोरात, ॲड.विजय भगत,ॲड. शांताराम दामगुडे,ॲड.अनिल शेजवानी, ॲड,विनोद आढाव, ॲड.डांगे सर, ॲड.धीरज कुचेरिया,ॲड.भवले सर,ॲड.प्रिया रसाळ, ॲड.ओमकार नानेकर,ॲड.नाझिया मॅडम,ॲड.पुनम शर्मा,ॲड.पुनम राऊत, ॲड.साक्षी झिरवनकर सोनवणे इत्यादी वकील वर्ग हजर होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. पांडुरंग विठ्ठल शिनगारे
उपाध्यक्ष ॲड. अजय रामसुमेर यादव
सचिव ॲड. संदिप भाऊसाहेब तापकीर
महिला सचिव ॲड. संगीता रमेश कुशलकर
सहसचिव ॲड. पदमावती लक्ष्मण पाटील , खजिनदार ॲड. विशाल आसाराम पोळ , हिशोब तपासनीस पदी ॲड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच सदस्य पदी ॲड. विजय धोंडिराम भोंडे, ॲड. अक्षय कमलाकर चौधरी, ॲड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, ॲड. पौर्णिमा भगवान मोहिते, ॲड. रूपाली रामचंद्र पवार , ॲड. सुषमा सुदर्शन पाटील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.विशाल पोळ व ॲड.सुनील कडूसकर यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड.संदीप तापकीर यांनी केले.








