धर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा – डॉ. राजेंद्र कांकरिया


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड. च्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उच्छाहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया बीएडच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थिनी शितल डुंबरे यांनी उद्देशिकाचे वाचन करून उपस्थित त्यांना शपथ दिली.
संविधान दिनाचे उद्घाटन भारताच्या संविधानाचे पूजन डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनी प्रियंका श्रीवास्तव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विशद केली; तर कविता वाचन किरण पाटील या विद्यार्थिनीने केले.



प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र कांकरिया आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, देशाच्या संविधानाने धर्मनिरपेक्षता मूल्य स्वीकारले आहे. अनेक धर्म आहेत धर्म ही वैयक्तिक बाब आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. संविधानाचे वाचन करून त्याचे महत्त्व दैनंदिन जीवनात कृती रूपी व्यक्त करण्याचे आवाहन यावेळी डॉ. कांकरिया यांनी करून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. व्यक्तीनिष्ठ पेक्षा वस्तुनिष्ठ राहिले पाहिजे अंधश्रद्धा बाळगू नका समाज घडविण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी असून शिक्षक म्हणजे नोकरी करणे नसून शिक्षकी पेशा उरत समजून भावी काळात स्वीकारा भोवताली घडणाऱ्या गोष्टींची जिज्ञासा बाळगून सामान्य ज्ञान यात भर करावी असे शेवटी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गायकवाड म्हणाल्या, देश किंवा राज्य चालविण्यासाठी आपले हक्क व अधिकार संविधान देतो, कर्तव्य जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो आपले कर्तव्य विसरू नका असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थिनी ऋतुजा कांबळे यांनी केले, पाहुण्यांची ओळख वैशाली दांडेकर यांनी तर; आभार सुवर्णा भदाणे यांनी मानले.








