Author: maharashtrabreakingnews.com

  जागृती महिला बचत गटाला ४२२ बॅग बनविण्यासाठी खरेदीचा आदेश   पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) या संस्थामध्ये 2023 मध्ये महिला स्वयंसहाय्यता गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारामध्ये पुढील 5 वर्षामध्ये  5000 स्वयंसहायता महिला गटांना  (Self Help Group-SHG) सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटांना “सक्षम” करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असून यामध्ये बचत गटाचे सर्वेक्षण करणे, क्षमता बांधणी करणे, गटाचे पायाभूत सभासद प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास व नेतृत्व विकास यासारख्या आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. टाटा स्ट्राइव्ह व कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी व युवा वर्गाला व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात…

Read More

 वातावरणीय अर्थसंकल्पबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण   पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –   वेगाने बदलणारे जागतिक हवामान, त्याचा पर्यावरण आणि मानवावर होणारा परिणाम लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल साधत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नियमित अर्थसंकल्पात पर्यावरणीय अर्थसंकल्पाचा समावेश करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली  सन २०२५-२६ पासून  नियमित अर्थसंकल्पासोबत पर्यावरणीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे आज पासून  प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना इंदलकर बोलत होते.  यावेळी मुख्य लेखा…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी कार्तिक निवते याने बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल सीजन ३, २०२४-२५ या स्पर्धेत स्केटिंग प्रोफेशनल क्वाडस या क्रीडा प्रकारात अकरा वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन केले. कार्तिक निवते याने पुणे विभागात २०० मीटर मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच ५०० व ८०० मीटर मध्ये कांस्यपदक मिळवून एकूण तीन पदकांची कमाई केली. त्याला क्रीडा शिक्षक महेश नलावडे, प्राचार्य डॉ. बिंदु सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा यांचे मार्गदर्शन लाभले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर…

Read More

पिंपरी चिंचवड विद्यापीठात एच. आर. समिट संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  उद्योग, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना उपलब्ध असणाऱ्या संधी प्राप्त करून देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक उन्नतीसाठी व नियोजित ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची समन्वयक म्हणून भूमिका महत्त्वपूर्ण असते असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनीमाला पुरी यांनी केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे एच. आर. शेपर्स आणि पीसीयू  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एचआर समिट २०२४” या कार्यक्रमात विविध कंपन्यातील मनुष्यबळ अधिकारी उपस्थित होते, यावेळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक 30 व 32 येथील शिल्लक सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता पीएमआरडीएने 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. पीएमआरडीएच्या घरांसाठी शुक्रवार(दि. 29) अखेर पाच हजार 216 नागरिकांनी नोंदणी केली. त्यापैकी प्रत्यक्षात दोन हजार 213 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली. तर, एक हजार 969 नागरिकांनी अनामत रकमा भरल्या आहेत. या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ईडब्ल्यूएसमध्ये 47 आणि एलआयजी प्रवर्गातील 614 सदनिका आहेत.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने ईव्‍हीएम विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी इव्‍हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी संघटनेच्‍या वतीने केली. ‘चौकशी न झाल्यास जनतेतून मोठा उठाव होऊन ईव्‍हीएम हटविले जाईल,असा सूर आंदोलनातील विविध सामाजिक पदाधिकाऱ्यांनी आळविला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, धम्मराज साळवे, शांताराम खुडे, रोहिनाज शेख, प्रदीप पवार, संजीवनी पुराणिक, सीपीएमचे सचिन देसाई, संतोष शिंदे, शरद थोरात आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले. शहराध्यक्ष सतीश काळे म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेला अपेक्षित असलेले मुद्दे, शासकीय धोरणे राबविण्याबरोबरच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती ला प्रचंड यश मिळाले आणि हे यश मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे धुरंधर नेते आदरणीय देवेंद्र  फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व समाजातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रचंड मेहनतीने भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी मिळविले आणि या यशाचे खरे शिल्पकार देवेंद्र  फडणवीस हेच आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी पिंपरी येथील शनि मंदिरामध्ये अखंड सिंधी समाज्याच्या वतीने होम हवन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि व्यापारी गुलूसेठ आसवानी,गोपीसेठ आसवानी, विजय सबरवाल,भरत यादव,रामशेखर वाजपेयी,हरेश ओछानी, वाल्मिकी बनसोडे,अजय विंजारे आदी उपस्थित होते

Read More

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- येथील पार्श्वनाथ सोसायटीमधील जैन स्थानकामध्ये पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1डिसेंबर रोजी स्व. प्रा प्रकाश पगारिया यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त चाळीसावे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 71जणांनी रक्तदान केले.त्यामध्ये जेष्ठ नागरिक श्री. शांताराम जाधव यांनी वयाच्या 68व्या वर्षी ,या शिबिरात 40व्या वेळी रक्तदान केले. गेली 40 वर्ष पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने सातत्याने या दिवशी रक्तदान शिबिर घेतले जाते .एकूण 3000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आजपर्यंत या शिबिरामध्ये रक्तदान केले आहे.श्री जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते. आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने हे आयोजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कासारवाडी येथील माजी नगरसेवक श्याम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्याम आण्णा लांडे मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी निवृत्ती लांडे ,रमेश लांडगे, संजय लांडे, विठ्ठल राजपुरे ,दादासाहेब बरसाळ, सयाजी लांडे ,शरद आवटे भानुदास लांडगे ,पंडित लगारे ,अमित लांडे, संजय कुंदर, गणेश मातेरे, आशिष लांडे ,आशुतोष लांडे, संग्राम घाटविसावे, ज्ञानेश्वर कवडे, दत्तात्रय पवार , गिरीश नायर, तुषार लांडे,प्रसाद कुलकर्णी ,सखाराम जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान, हृदयविकार, मधुमेह चाचणी…

Read More

सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी मतदारांचे आभार मानले. पिंपळे गुरव, नवी सांगवी, आणि सांगवी परिसरातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाने आणि प्रेमाने आपले मन भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या सन्मानाने आणि प्रेमाने मी धन्य झालो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्यानेच आज चिंचवड विधानसभा महाविजयाचा साक्षीदार ठरला आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “या विजयामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, युवक-युवती, मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक, माझ्या सहकारी मंडळी आणि विशेषतः मायमाऊलींचा मोलाचा वाटा आहे. या परिसरातील सर्वांगीण विकासासाठी तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे, आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील…

Read More