- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांप्रदाय व आध्यात्म मधील तसेच नित्यनेम आळंदी वारकरी म्हणून ओळख असलेले,श्री दत्त सेवा मंडळ सद्गुरूनगर अध्यक्ष ह.भ.प.प्रभाकर मारुती भिवरे वय 70 यांचे दि 9 सोमवार रोजी पहाटे आकस्मित निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि 11/12/2024 रोजी सकाळी 8:00 वा भोसरी तळ्याकाठी होईल त्यांच्या मागे पत्नी लिलावती दोन मुले, मुलगी ,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव,महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य,वूई टुगेदर फाउंडेशन सल्लागार मधुकर बच्चे यांचे ते सासरे व चिंचवड भाजपा माजी प्रभाग अध्यक्षा रोहिणी बच्चे यांचे ते वडील होत.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गोरक्षा आयाम आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना दिनेश उपाध्याय बोलत होते. क्षेत्र गोरक्षा संघटन मंत्री भाऊराव कुदळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत गोरक्षा प्रमुख सी ए महेंद्र देवी, प्रांत सह प्रमुख कौस्तुभ देशपांडे, सहप्रमुख विलास फाटक, क्षेत्र गोभक्त महिला प्रमुख सुनीता देशमुख, विभाग मंत्री शिव व्यास, जिल्हा मंत्री संतोष खामकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “मानवी संस्कृती ही समाजाच्या एकत्रित योगदानातून समृद्ध होते!” असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. पिंपरी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित ‘विचारवंतांचे अंतर्मन’ या समीक्षापर पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. सौरभ पाटील, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, इंद्रायणी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, लेखिका ललिता सबनीस, प्रकाशक नितीन हिरवे आणि लेखक…
– प्रतिभा ज्युनियर कॉलेजचा क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात साजरा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील १५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राधिकरण येथील कै.संजय काळे क्रीडा संकुल मैदानावर क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात पार पडला. १०० मीटर धावणे, गोळा फेक, सीट अँड रिच, पुशप आदी क्रीडा स्पर्धात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील मुला-मुलींनी सहभाग नोंदवीत चमकदार कामगिरी पार पाडली. स्पर्धेपूर्वी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा शिक्षक व प्राध्यापकांच्या बैठकीत म्हणाले, खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभ्यासाबरोबर त्यांनी आवडत्या खेळात जास्तीतजास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. क्रिडा महोत्सवाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत ६७ तक्रारी वजा सूचना प्राप्त झाल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेत मुख्य समन्वय अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साउ ज्योती फौंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन गंज पेठ पुणे याठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. श्री. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या शाळेतील शितल भानुदास औटी यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साउ ज्योती फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आदर्शशिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभात कल्चरल फाऊंडेशन व नंदकिशोर कल्चरल अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा वार्षिक संगीत महोत्सव निगडी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलन प्रविण पोकरणा, अजिज सय्यद व अनिल देशपांडे यांच्या हस्ते झाला. अजिज सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना ख्यातनाम क्लेरोनेट वादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्रीयुत बाबुमियाँ बँडवाले यांचे कार्य प्रेक्षकांसमोर मांडले. यानंतर चिंतामणी नातू यांचे धृ्रपद गायन झाले., गायनानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले. अनिल देशपांडे यांना पुरस्कार देवून त्यांचा सत्कार प्रविण पोकरणा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अंजली शिंगडे राव (व्हायोलिन वादक) यांचा पुरस्कार देवून भानुप्रताप बर्गे (एसीपी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान देशभरातील २९ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते कोळसा मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय समोरील समस्यांवर पर्याय देण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹1 लाख चे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ११ डिसेंबर रोजी पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली येथील कुदळवाडी परिसरातील भंगार गोदामासह काही दुकाने व लघुऊद्योग अस्थापनांना सकाळी दहाच्या सुमारास आग लागली असुन आगीत पन्नास पेक्षा अधिक दुकाने जळाल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोन तासा नंतर देखील आग आटोक्यात आली नव्हती. आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर होते. पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासनाच्या सर्व यंत्रणेकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचा धोका ओळखुन एका रहिवाशी इमारतीमधील कुटूंबातील व्यक्ती घराबाहेर काढून इमारत खाली करण्यात आली. सध्या तरी कुठलीही जिवीतहानी न झाल्याचे प्रत्यक्षदर्शिकडून सांगण्यात आले आहे. ‘सकाळी सव्वा दहाच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याची…
जितो पिंपरी चिंचवड च्या अध्यक्ष पदी आनंद मुथा तर उपाध्यक्ष पदी तुषार लुणावत यांची निवड पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जितो पिंपरी चिंचवड चा शपथ ग्रहण सोहळा चिंचवड येथील एल- प्रो मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जितो पिंपरी चिंचवड चँप्टरच्या अध्यक्षपदी:आनंद मुथा, उपाध्यक्षपदी: प्रकाश गादीया, दिलीप सोनिग्रा, मुख्य सचिव: तुषार लुणावत, सचिव: अभिषेक जैन, नितीन जैन, खजिनदार: नवनीत बोरा, संयुक्त खजिनदार: सीए वैभव मोदी, चॅप्टर डायरेक्टर: प्रितम दोशी, हर्षद खिंवसरा, राजेंद्र मुथा, अशोक बागमार, नेमिचंद ठोळे, दीपेश बाफना, सचिन धोका, सल्लागार समितीपदी: राजेंद्र जैन, संतोष धोका, मनीष ओसवाल, तृप्ती कर्णावट, वैशाली बाफना यांची निवड करण्यात आली आहे.…
