देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान देशभरातील २९ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते कोळसा मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय समोरील समस्यांवर पर्याय देण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹1 लाख चे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ११ डिसेंबर रोजी पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ..मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल सेंटर मुख्य अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, सहाय्यक नोडल अधिकारी डाॅ.निशांत टिकेकर, स्पर्धा निमंत्रक प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

