- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या ओजस्वी विचारांनी आणि स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्वाने करोडो भारतीयांच्या मनात राष्ट्राभिमान चेतवला आहे. आजच्या दिवशी त्यांच्या विचारधारांचा वारसा जपत देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा दृढनिश्चय करून अटलजींच्या विचारांचे पालन करीत कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. काव्यात्मक भावनेची आणि राजकीय दूरदृष्टीची साक्ष देणारे अटलजी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील, अशी भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्त्रोत, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आज १००वी जयंतीनिमित्त पिंपरी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
शहरात 1 ते 10 जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला 100 टक्के विजयासाठी आतापासूनच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदस्य नोंदणीच्या कामाला लागा, असे आवाहन कसबा विधानसभा आमदार हेमंत रासने यांनी केले. भारतीय जनता पार्टी नवीन सदस्यता नोंदणी अभियानाचे पिंपरी चिंचवड जिल्हाचे प्रभारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्यता नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेश…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा प्रवेश नियम पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, नेहमीच सेवा प्रवेश नियमामध्ये कर्मचारी वर्गावर अन्याय केला जात आहे. जर सेवा प्रवेश नियम हा कर्मचारी वर्गाच्या हितासाठी केला जात असेल तर तो कर्मचारी वर्गांना पाहण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकावा अशी मागणी शिव-फुले-शाहू- आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे एका केला आहे.यावेळी लिपीक संवर्ग हक्क परिषदेचे सरचिटणीस परशुराम कदम,प्रसिद्धी प्रमुख संजय घुले तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सेवा प्रवेश नियम (२०२०) शासनामार्फत मंजूर झालेला आहे. त्याची अमंलबजावणी १८/०२/२०२०…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मेघराज लोखंडे यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकी येथे आढावा व पाहणी करत महानगरपालिका प्रशासन येथे दुर्लक्ष करत आहे व त्या ठिकाणी अस्वच्छता खूप जास्त प्रमाणात पसरली आहे. डेंग्यू,चिका अश्या प्रकारच्या रोग पोलीस बांधवांना झाल्यास त्या ठिकाणी जबाबदार कोण? असा प्रश्न देखील मेघराज लोखंडे यांनी म.न.पा प्रशासनाला विचारला आहे. मेघराज लोखंडे यांनी पोलीस चौकी येथे पाहणी करत संबंधित म.न.पा अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना देत पोलीस चौकीतील बंद असलेले बंद स्ट्रीट लॅम्प,डासोत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणी अळीनाशक औषध फवारणी तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साफसफाई चे काम करून घेतले.अस्वच्छता असलेल्या ठिकाणी उद्यान विभागाने किंवा आरोग्य विभागाने साफसफाई…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नुकत्याच बिना इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2024 उद्घाटन भव्य दिव्य स्वरूपात शरनपाल कौर जितू कटारिया यांच्या हस्ते स्पर्धेची प्रथम लढत लावत उद्घाटन केले. त्याप्रसंगी भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष पाशा आत्तार रविराज गाढवे सचिव पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग गणेश मांढरे अभिषेक शिंदे प्रियंका अच मट्टी कारभारी गायकवाड किरण माने बॉक्सिंग कोच जितू कटारिया क्रीडा संघटक सुनील साठे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अकमल खान…
घरेलू कामगार कायदा प्रस्ताव चर्चासत्र संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यात कामगार चळवळीला एक मोठा इतिहास आहे कामगारांनी लढून मिळवलेले कामगार कायदे मोडीत काढून चार श्रम संहिता केल्या आहेत हे सरकार आदानी – अंबानीच्या हिताचे काम करते आहे कष्टकऱ्यांना, कामगारांना काही द्यायचंच नाही अशी भूमिका शासनाची आहे, त्यामुळे आता आपल्याला लढावे लागेल कामगार संघटनात आणि चळवळीला आलेली मरगळ झटकून पुन्हा नव्याने चळवळ उभी करावी लागेल असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढावा यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय घर कामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीकडून तर्फे श्रमिक भवन पुणे येथे घरेलू कामगार कायदा बाबत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. पिंपरी-चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पसंचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. रांगोळी, मेहंदी, काव्य वाचन, वक्तृत्व, पाककला अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांसाठी फनफेअर, फूड फेस्टिव्हलचे व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत होते यावेळी पालक सिमा सिंग, जया तळेकर, पुजा माने,पुजा साखरे, निर्मला सावंत, जसदू सुतार, शांती चौधरी, दिपाली जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच ई-वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ई वाहन धोरणाअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ई रिक्षाधारकांना अनुदान धनादेश देण्यात आला. शहरातील जास्तीत जास्त ई-रिक्षाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२१’ राबविण्याबाबत मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने शहरातील वायू प्रदूषण कमी करणे तसेच ई-वाहन धोरणाला चालना देणे, ई-वाहन वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे यासाठी महापालिकेच्या वतीने ई रिक्षाधारकांना अनुदान देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकराव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चऱ्होली येथील स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसविणे तसेच बोपखेल आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन…
