- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सवित्रिबाई फुले जयंतीचे औचित्य साधत मुबंई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यलयात नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीचा विविध विभागच्या प्रदेश अध्यक्षनी केलेल्या कार्याचा लेखा जोखा अहवाल घेतला गेला. सदर बैठक राज्य सभा खासदार सुनित्रा पवार ,पार्टी प्रदेश अध्यक्ष खा.सुनिल तटकरे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवजीरावं गर्जे यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न होत असताना सुनील तटकरे व खा. सुनित्रा पवार यांनी सखोल मार्गदर्शन करत आसताना आगमी काळात कामकजाची व्यप्ती वाढून पक्ष संघटन कसे मोठे होईल यांच्या सुचना सर्व विभागच्या प्रदेश अध्यक्षाना देऊन झालेल्या विधानसभेच्या कामाचे कौतुक केले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज दिव्यांग भवन मोरवाडी, पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड हद्दीतील म्हाडा गृह प्रकल्पातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे म्हाडा यांच्यामध्ये समन्वय बैठक झाली. या बैठकीत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याशी म्हाडा सदनिका धारकांना भेडसावणाऱ्या विविध पायाभूत समस्या सोडवण्यासाठी चर्चा झाली. याशिवाय अन्य शहर विकासाच्या कामांबाबत व नागरी हिताच्या कामांची सोडवणूक करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे, प्रा. दत्तात्रय भालेराव, पुणे म्हाडाच तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्या नंतर प्रथमच आळंदी मंदिरास सदिच्छा भेट देत माऊलींचे संजीवन समाधीची पंचोपचार पूजा करीत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी वेदमंत्र जयघोषात त्यांनी पूजा करत श्रींचे दर्शन घेतले. आळंदी जवळील वेदश्री तपोवन मध्ये आयोजित कृतज्ञता संत संवाद सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या सोहळ्या पूर्वी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सावली मंदिरात भेट दिली. या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अजमेरा ग्राउंड, स्केटिंग ग्राउंड, जीम, बॅडमिंटन हॉल वीज बिल न भरल्याने अनेक दिवसांपासून बंद आहे. लाखोंचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज कट करण्यात आली असून, क्रीडा सुविधांपासून येथील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे, क्रीडा विभागाकडून सर्व सुविधा त्वरित सुरू करण्याची मागणी भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पत्रा निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर येथील मनपाचे जलतरण तलाव मागील आठवड्यापासून बंद असल्याने खेळाडू आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, अतिक्रमण विभागाने अतिक्रमणाचे साहित्य याठिकाणी साठवून ठेवल्याने साठलेला…
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोफत शाळा सुरू केल्या, सरकार, महापालिका यांनी आधुनिक शिक्षणासाठी पदवी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण द्यावे – इम्रान शेख पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या,बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे,सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे कार्य केले.त्यांनी भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू करून शिक्षणाशिवाय गरिबी हटणार…
सावित्रीबाई फुले हे नाव केवळ एका स्त्रीचे नसून, ती एक विचारधारा आहे – योगेश बहल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल तसेच महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र , घरेलू कामगार विभागातर्फे आज कष्टकरी संघर्ष महासंघाचे कार्यालयात मध्ये गुणवंत कष्टकरी घरेलु कामगार उषा नारसोडे, जयश्री शेलार यांचा सन्मान करण्यात आला. सावित्रीबाईंचा कार्याचा आदर्श घेत कामगार महिलांनी एकत्रित येऊन एकमेकास सहाय्य करत महिला वरील अन्याय दूर करून त्यांच्या हक्काची लढाई लढण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नकाते, महिला अध्यक्ष माधुरी जलमुलवार , निमंत्रक माया शेटे,विमल बनसोडे,नंदा जाधव,सरस्वती डोले,अविद्या मामडे,ज्योती पाखले,जयश्री शेलार ,शांताबाई मिरशिष्ठी ,सुमन सकाटे,बायजाबाई सोनसाळे,रंजना मुरगुंडे साधना काळे,निशा तांदळे,संगीता शिंदे,सुनंदा वैरागे ,मीनाक्षी बोराटे आदी उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड मनपाच्या क्रीडा विभागातर्फे दिनांक ०२/१/२०२५ रोजी इंदिरा गांधी उद्यान दुर्गादेवी टेकडी निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शालेय चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन समारंभ श्री पंकज पाटील साहेब उपायुक्त (क्रीडा पिंपरी चिंचवड मनपा) यांचे शुभहस्ते व श्रीमती अनिता केदारी (क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा) यांची उपस्थिती संपन्न झाला. इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन वयोगटात मुलां मुलींच्या स्वतंत्र घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत एकूण २०२७ विद्यार्थी व १४७ शाळांनी सहभाग नोंदविला. वयोगट क्रमांक १. पाचवी ते सातवी ( १) माझा आवडता खेळ(२) झाडे लावा झाडे जगवा(३) भारतीय सण तसेच. वयोगट…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “ए शाम मस्तानी…” अशा जुन्या हिंदी – मराठी सदाबहार चित्रपटगीतांच्या साभिनय सादरीकरणातून ज्येष्ठांनी आपल्या चिरतारुण्याचा प्रत्यय यमुनानगर, निगडी येथील रसिकांना दिला. आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त ‘जाने कहॉं गये वो दिन…’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी माजी नगरसेवक उत्तम केंदळे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, सुमन पवळे, कमल घोलप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा आढी, गिरीश देशमुख, आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष भानुदास कदम, सचिव कचरू जगदाळे, सहसचिव माणिकराव माने, खजिनदार श्रीकृष्ण पुरोहित, सहखजिनदार बाळकृष्ण ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुलभा उबाळे यांनी…
प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत चिंचवड मतदार संघातील माजी नगरसेवकांसह बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विधानसभेचे नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोड’वर असल्याचे पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणींवर चर्चा करण्यासाठी त्यांनी आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाजवले पहिलेच अधिवेशन विधानसभा निवडणूक झाल्यानंतर झालेल्या नागपूर अधिवेशनात निळ्या पूररेषेतील बांधकामांसह मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत आमदार जगताप यांनी अधिवेशन गाजवले. वाहतूक समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यावर…
