इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे कार्य पुढील काळात युद्धपातळीवर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट



आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्या नंतर प्रथमच आळंदी मंदिरास सदिच्छा भेट देत माऊलींचे संजीवन समाधीची पंचोपचार पूजा करीत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी वेदमंत्र जयघोषात त्यांनी पूजा करत श्रींचे दर्शन घेतले. आळंदी जवळील वेदश्री तपोवन मध्ये आयोजित कृतज्ञता संत संवाद सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या सोहळ्या पूर्वी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सावली मंदिरात भेट दिली. या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब विश्वस्त भावार्थ देखणे आळंदी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार महाराज भोसले, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले, भाजप केंद्रीय समितीचे निमंत्रित सदस्य डॉ.राम गावडे, निलेश महाराज लोंढे, संजय महाराज घुंडरे, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, उमेश महाराज बागडे, श्रीधर सरनाईक, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, सूर्यकांत उर्फ अप्पा बारणे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कु-हाडे पाटील, मंगला हुंडारे, संगीता फफाळ, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, स्वामी सुभाष महाराज यांचेसह ग्रामस्थ, वारकरी भाविक उपस्थित होते.

यावेळी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ तसेच विविध सेवाभावी संस्था यांनी येथील विविध विकास कामांसह इंद्रायणी नदी प्रदूषण यावर निवेदनातून लक्ष वेधले. विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदने देण्यात आली. आळंदी देवस्थान तर्फे देखील विकास कामांसाठी निवेदन देण्यात आले. यात गायरान जमीन विकास प्रकल्प, दर्शन बारी आदींसह निवेदन देत संवाद साधण्यात आला.
आळंदी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा निवेदन देत सत्कार केला. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उगम ते संगम विकास होणे आवश्यक असल्याचे निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात महापालिका, ग्रामपंचायती, नगरपरिषदा यांचे हद्दीतील सांडपाणी शुद्ध केले जाणार आहे. सांडपाणी नद्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना सुरू करण्यात आले आहेत. यास निधीची कमतरता नाही. उद्योगाचे दूषित पाणी देखील नद्यात जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. मात्र हे काम अल्प काळात एक दिवसात पूर्ण होणारे नाही. त्यास वेळ द्यावा लागेल. यासाठी आवश्यकते नुसार निधी ही देण्यात येईल. नद्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी उपाय योजना राबविल्या जातील पुढील काळात ते काम युद्ध पातळीवर केले जाईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आळंदीत माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. प्रत्येका करता हा क्षण सुखाचा असतो. हा क्षण मला अनुभवण्यास मिळाला आहे. नद्या प्रदूषण मुक्त साठी कामकाज सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेदश्री तपोवन येथे आयोजित संत कृतज्ञता संवाद उपक्रम स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परम पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परमपूज्य गुरुवर्य बाबाजींचे पूजन करण्यात आले. याशिवाय उपस्थित मान्यवर कृतज्ञता संत पूजन उत्साहात झाले.
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी पुढील काळात युद्ध पातळीवर काम करणार :- मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आळंदीत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपली जी परंपरा आहे, ती वारकरी विचारांची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज विचाराने महाराष्ट्र जो पुढे गेला आहे. तोच भविष्यातही पुढे जाणार आहे. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे एवढं सहजा सहजी सोपं काम नाहीये. त्यासाठी व्यवस्था तयार करावी लागते ग्रामपंचायत महानगरपालिका या सर्वांना सांड पाण्याविषयी बोलण्यात आले आहे येणाऱ्या काळात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे काम युद्ध पातळीवर करणार आहे असे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलले.
वारकरी परंपरा महाराष्ट्राला दिशा देणारी आहे.








