Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवसही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजला. महोत्सवात दुसऱ्या दिवशी युवा गायक विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन, सुप्रसिद्ध बासरी वादक पं. हिमांशू नंदा यांचे बासरी वादन आणि गायत्री जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली. नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सुरू असलेल्या कलाश्री संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी स्व. पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी राग मधुवंतीमध्ये मधुबन में शाम ही विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. तसेच मध्यलय तीनतालमध्ये ‘उन्हीं से मोरी लगन लागी रे’ सादर केले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेले ‘दान करी रे गुरुधन…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट युथ टीम आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२५ मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिरात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ विजय सारडा, युथ टीमचे अध्यक्ष एमजेएफ प्रदीप कुलकर्णी, पुणे प्रांतपाल बी. एल. जोशी, महानगरपालिका संगणक विभागप्रमुख नीळकंठ पोमण, प्रा. शैलजा सांगळे, लायन शशांक फाळके, लायन वसंत कोकणे, लायन मीनांजली मोहिते आणि नंदिता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ३६ वा राष्ट्रीय सुरक्षा अभियान अंतर्गत सुरक्षेचे धडे व नियम जागृता शिबीर ई सी आर एस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते. यावेळी त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक  प्रदीप शिंगारे  व ई सी आर एस चे मान्यवर तसेच शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे चेअरमन रोशन मिस्त्री व त्यांचा स्टाफ तसेच ई सी आर एस चे  ड्रायव्हर बंधू उपस्थित होते.ई सी आर एस कंपनी चे मालक दीपक मोढवे पाटील आहेत

Read More

. *कृपया प्रसिध्दीसाठी* प्रति, मा.संपादक साहेब दैनिक………….. नारी शक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ – योगेश बहल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरीतील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राज माता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष  योगेश बहल तसेच शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहल म्हणाले की, आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथांनी प्ररेरित केले होते. त्याकाळात महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता…

Read More

दिव्यांग सहारा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी. चिंचवड महापालिका हद्दीतील पथारी, स्टॉल धारकांचे सर्वेक्षन पूर्ण झाले असून त्यांना परवाना देण्यासाठी फॉर्म भरून घेतले गेले आहेत.तरीदेखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पथारीधारकांवर होणारा त्रास अन्यायकारक आहे. यामध्ये काही स्टॉलधारक दिव्यांग आहेत अशा दिव्यांग स्टॉलधारकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाणे सोडवणार असे आश्वासन कष्टकरी व फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिले. भोसरीमधील महासैनिक औद्योगिक वसाहत येथे आयोजित अपंग (दिव्यांग)सहारा संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उडान दिव्यांग फाउंडेशनचे आनंद बनसोडे,अल्टीग्रीन ऑटोमोबाईल कंपनीचे वैभव पाटील,अपंग (दिव्यांग )सहारा संस्थेचे अध्यक्ष…

Read More

अमृतमहोत्सवानिमित डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संत तुकारामनगर येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. संतसाहित्याचे अभ्यासक, आळंदी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. शिवाजीराव मोहिते आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे; तसेच लेखक श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेणार असून, सदरचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या सभागृहात बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजता होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी सांगितले.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “बाजीराव सातपुते हे मातेशी आणि मातीशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व आहे!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  चऱ्होली येथे (शनिवार, दिनांक ११) व्यक्त केले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारप्राप्त बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे, माजी सभापती सुभाष उमाप, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी गाव पवनेश्वर मंदिर जवळील महात्मा फुले क्रीडांगणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास खेळाडू वर्गाला होत आहे, या क्रिडांगणाची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरीतील सामाजिक युवा कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी  महापालिका प्रशासनाला प्रसिद्ध पत्रकाद्वारे  केली आहे. दिलेल्या  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी गाव परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या या क्रीडांगणा रोज सकाळी – संध्याकाळी व्यायामासाठी , वॉकिंग साठी जेष्ठ नागरिक, तरुण सहकारी , खेळाडू येत असतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप नाहक त्रास होत आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. महापालिका प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी…

Read More

एमआयटी एडीटीत सरकारी अभियोक्त्यांचे मार्गदर्शन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजपर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सरकारी अभियोक्त्यांनी (वकिलांनी) आपल्या अशिलाची चांगल्या पद्धतीने बाजू मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे, सरकारी अभियोक्ता हे न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ असून, त्यांच्या कार्यामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास दृढ होतो, असे मत विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी मांडले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ लाॅ तर्फे आयोजित ‘सरकारी अभियोक्ता आणि कायदेशीर सुधारणा’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. या सत्रात २० सरकारी अभियोक्त्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या सत्रासाठी, सुप्रिया मोरे(सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता),…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पुण्यातील प्रसिद्ध मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. शैलेश हदगांवकर हे मणक्याच्या उपचारांना अनुकूल बनवणे, मणक्याच्या प्रगत शस्त्रक्रियेमध्ये क्रांती घडवून आणणे, मणक्याच्या शस्त्रक्रियेच्या सरावात उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेचे मानक स्थापित करण्यात अग्रेसर आहेत. पुण्यातील संचेती रुग्णालयातील स्पाइन अँड न्यूरोसायन्स युनिटचे प्रमुख डॉ. शैलेश हदगांवकर यांना एओएकडून मराठवाडा गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या नेव्हिगेशन आधारित स्पाइन सर्जरी आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमधील त्यांच्या अग्रगण्य कार्याचा हा सन्मान आहे. औरंगाबाद येथील छ. संभाजी नगर येथील हॉटेल हयात प्लेस येथे ५ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या MOA-AOA स्पाइन कॉन्क्लेव्ह (महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन-औरंगाबाद ऑर्थोपेडिक असोसिएशन)…

Read More