दिव्यांग स्टॉलधारकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाणे सोडवणार – काशिनाथ नखाते


दिव्यांग सहारा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी. चिंचवड महापालिका हद्दीतील पथारी, स्टॉल धारकांचे सर्वेक्षन पूर्ण झाले असून त्यांना परवाना देण्यासाठी फॉर्म भरून घेतले गेले आहेत.तरीदेखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पथारीधारकांवर होणारा त्रास अन्यायकारक आहे. यामध्ये काही स्टॉलधारक दिव्यांग आहेत अशा दिव्यांग स्टॉलधारकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाणे सोडवणार असे आश्वासन कष्टकरी व फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिले.

भोसरीमधील महासैनिक औद्योगिक वसाहत येथे आयोजित अपंग (दिव्यांग)सहारा संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उडान दिव्यांग फाउंडेशनचे आनंद बनसोडे,अल्टीग्रीन ऑटोमोबाईल कंपनीचे वैभव पाटील,अपंग (दिव्यांग )सहारा संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनावणे, मनपा सदस्य किरण साडेकर, रणरागिणी महिला लघु उद्योग सोशल फाउंडेशनच्या सरोन कुचेकर उपाध्यक्ष गणेश तेली, खजिनदार संजीवनी सिरसाट,सचिव नानासाहेब डाडर यांचेसह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.
समारंभात श्रीमती मिनिता पाटील (कला), श्री. नंदकुमार फुले (प्रशासकीय), श्री. प्रकाश मोहारे (क्रीडा), धर्मेंद्र सातव व शिवाजी भेगडे (दिव्यांग कल्याण)यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
अपंग (दिव्यांग)सहारा संस्थेचे सल्लागार श्री हरिदास शिंदे यांनी कार्यक्रमाचे सत्रसंचलन, प्रास्ताविक तसेच उपस्थितांचे मानले.
गव्हाणे यांनी दिव्यांग बांधवांच्या उल्लेखनीय कामाचे व दिव्यांग संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. नखाते पुढे म्हणाले, दिव्यांगत्वाचे अनेक प्रकार आहेत.दिव्यांग बांधव कोणत्याही स्वरूपामध्ये आलेल्या दिव्यांगत्वावर निराश न होता जिद्दीनं, ताकतीन उभे आहेत त्यांच्या जिद्दीला सलाम करण्याची गरज आहे. दिव्यांगांना कुणाची भीक नको तर संधी देण्याची गरज आहे.








