- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पीसीएमसी कर संकलन विभागाची चिखली परिसरात कारवाई पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्याने जप्त करण्यात आलेली सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेज, पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली या मालमत्तेचे सील तोडून आतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सुरेश विठ्ठल जाधव (रा.चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्यावर मागील आठवड्यात (७ जानेवारी २०२५) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करसंकलन विभागाच्या चिखली विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकारी बाळु रामचंद्र लोंढे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२९ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध मोहीम…
निःस्वार्थी सेवा म्हणजे वूई टुगेदर फाउंडेशन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातच नाही तर जवळपास संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गरजुना आवश्यक निःस्वार्थी सेवेचे काम करणारे वूई टुगेदर फाउंडेशन आहे.चिंचवड येथे वूई टुगेदर फाउंडेशनची सर्वसाधारण सभा पार पडली यात सर्वांनुमते वूई टुगेदर फाउंडेशनच्या अध्यक्षपदीमधुकर बच्चे यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी,सदस्य,व मान्यवर यांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेऊन एवढी मोठी जबाबदारी दिली सर्वांचे मनःपूर्वक आभार या पदाला प्रामानिक न्याय देण्याचा प्रयत्न करीन.संस्थेचे ब्रीद वाक्य निःस्वार्थी सेवा याला साजेसे कार्य होईल.गरजुना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न राहील.व सामूहिकपणे संस्थेचे कार्य आणखी पुढे नेईल,अशी मधुकर बच्चे यांनी आपल्या मनोगतात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुस्तक वाचनाने मनुष्याचे मन आणि मस्तिष्क प्रगल्भ होते. त्यामुळे व्यक्तींच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या जाऊन त्यांचे व्यक्तिमत्व बहरते, विचारक्षमतेला चालना मिळते आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवणे हे अधिक गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत “ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे, नौरोसजी वाडिया…
मकर संक्रांत उत्साहात साजरी ; पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेशावर मर्यादा आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मकर संक्रांती निमित्त परिसरातील लाखावर महिला भाविकांनी माऊलींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत सुवासिनिनी श्रींचे दर्शन घेत ओवसा वाहत एकमेकींना ओवसा देत मंदिर प्रदक्षिणा करीत श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत श्रीना तिळाचा अभिषेक करण्यात आला. श्रीनां हलव्याचे दागदागिने, लक्षवेधी पुष्प सजावट, वस्त्रालंकार परिधान केल्याने श्रींचे लक्षवेधी रूप सजले होते. वेदमंत्र जयघोषात वेदमूर्तीनी श्रीना अभिषेख, पोशाख केला. आळंदीतील विविध मंदिरात महिला भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. मंदिर परिसरातील रस्ते महिलांचे गर्दीने फुलले होते.…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने साहित्यिक व कलाकार मेळावा संपन्न तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -समाजाच्या निकोप वाढीसाठी, स्वास्थ्यासाठी कलांची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कलाकारांचे अत्यंत महत्त्व आहे. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान व्हायला हवा, अअशी अपेक्षा आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रीक्रिएशन हॉलमध्ये मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेळके बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नाट्य परिषदेचे विश्वस्त सुरेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या बातमीचा इम्पेक्ट पिंपरीतील महात्मा फुले मैदानाची अवघ्या २४ तासात साफसफाई झाली.पिंपरी गाव पवनेश्वर मंदिर जवळील महात्मा फुले क्रीडांगणात घाणीचे साम्राज्य होते. पिंपरी गाव परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या या क्रीडांगणा रोज सकाळी – संध्याकाळी व्यायामासाठी , वॉकिंग साठी जेष्ठ नागरिक, तरुण सहकारी , खेळाडू येत असतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप नाहक त्रास होत होता , तसेच संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. महापालिका प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा तेथे कारवाई होत नाही. या ठिकाणी अक्षरशः रोज संध्याकाळी मद्यपींची मैफिल बसते. खूप मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक…
वडगाव मावळ-, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले व शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालय वडगांव मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ७४ शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या असून त्यापैकी बहुतांशी निकाल तात्काळ देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसात निकाल देण्यात येईल. मावळ तालुक्यातून जात असलेल्या रिंगरोड मुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून बहुतांश शेतकऱ्यांना रिंगरोडचा मोबदला भेटला असून अनेक गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये आपआपसात मतभेद असल्याने अद्याप मोबदला मिळाला नाही मोबदला देण्याचा अवधी उलटून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के कपात करून…
‘पर्पल जल्लोष’ महोत्सव १७ ते १९ जानेवारी दरम्यान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ जानेवारी दरम्यान हा महोत्सव चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर’ येथे होणार आहे. या महोत्सवांतर्गत ‘पर्पल सॉल्व्हथॉन २०२५’ ही अनोखी स्पर्धा होणार असून त्यासाठी देशभरातून तब्बल ५० संघ सहभागी होणार आहेत. याचा उत्साह आता शिगेला पोचला आहे. ‘पर्पल सॉल्व्हथॉन’च्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विविध उपाय शोधणाऱ्या दिव्यांग बांधवांना, तरुण नवोदितांना एकत्र आणणे, हे मुख्य…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार तसेच विकास करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशान्वये महापालिका स्तरावर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी समन्वय अधिका-यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मराठी भाषा अधिकृत राजभाषा असल्याने महापालिकेच्या वतीने या भाषेचा प्रचार प्रसार विविध स्तरांवर करण्यासाठी ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी ‘ म्हणून जबाबदारी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार,…
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने महेंद्र भारती सन्मानित पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिजात पाली भाषेचे जतन, संवर्धन आणि संशोधन करीत असताना महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी काढले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष…
