Author: maharashtrabreakingnews.com

– ‘टेकऑर्बिट’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आंबेगाव तालुक्यातील मंचरचा सुपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील अभियंता धनेश इंदोरे याचा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याने ‘टेकऑर्बिट’ नावाची कंपनी सुरू केली आणि अल्पावधीत यशाची शिखर गाठले. त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान अमूल्य आहे, असे गौरोवोद्गार भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी काढले. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील युवा उद्योजक धनेश इंदोरे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या धनेश इंदोरे यांना कोविड महामारीपूर्ण जागतिक दर्जाच्या कंपनीमध्ये विदेशात मोठ्या…

Read More

तळेगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी च्या कामाच्या मसुदा एमएसआयडीसीकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्याविषयी मावळचे आमदार सुनील शेळके,खेडचे आमदार बाबाजी काळे आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२२) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची एमएसआयडीसीच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बैठकीत एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित म्हणाले कि, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर,मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी यासांदर्भात एमएसआयडीसीकडून गेल्या १ जानेवारी रोजी प्रारुप…

Read More

पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग; विविध विषयांवर केली गटचर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ रोजी ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते, सल्ले, उपाययोजना जाणून घेण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये गटचर्चेचे (फोकस ग्रुप डिस्कशन) आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडीत तसेच विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, आरोग्याधिकारी, कर्मचारी तसेच शहर परिवर्तन कार्यालयाचे सल्लागार उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे. सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे. तेथे १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण होत आहे. या प्राचीन महादेव मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव येथे भरतो, महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येथे येत असतात. त्यामुळे या प्राचीन महादेव मंदिर परिसरास शोभेल असे या सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्यात यावे अशा सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. या कामासाठी नाना…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा उत्सवा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांनी दिली. पुणे – आळंदी पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ २५ जानेवारीला होत आहे. या निमित्त विना पूजन, कलश…

Read More

पालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी योगी निरंजन नाथसाहेब यांची तसेच २०२५ या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड झाल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मावळते प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांचं बैठक प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप त्यांचे अध्यक्षते खाली झाली. यावेळी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख, योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते. या बैठकीत पुढील वर्षभराचे कालावधीसाठी…

Read More

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झालेले डॉ. भावार्थ हे सर्वात युवा विश्वस्त आहेत. आळंदी येथे नुकत्याच झालेल्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. देखणे यांची पालखी सोहळाप्रमुखपदी तर योगी निरंजननाथ यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे आणि योगी निरंजन नाथ यांच्या नावाची घोषणा संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी केली. डॉ. देखणे, ॲड. उमाप व योगी निरंजन नाथ यांची गत वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी निवड झाली होती. ॲड. उमाप यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून तर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच शुल्क घेऊनही परवाना वाटप झाला नाही. फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. यासह अनेक मागण्यांसाठी शहरातील फेरीवाल्यांचा मोर्चा  आज गुरुवारी (दि. २३) पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडकणार आहे. टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने फेरीवाला समितीच्या सदस्या आशा बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार आहे. याबाबत पंचायत चे वरिष्ठ उपाध्यक्ष दामोदर मांजरे व कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील 20 हजार टपरी, पथारी, हातगाडीधारकांचा सर्वे करण्यात आला आहे. यापैकी 16…

Read More

पुणे, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज )  – मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) यांनी त्यांच्या प्रमुख उपक्रम ‘मुंबई बायोक्लस्टर’ अंतर्गत, दुसऱ्या डॉ. के. अंजी रेड्डी मेमोरियल फेलोशिप फॉर अफोर्डेबल बायोफार्मास्युटिकल्स हा मानाचा पुरस्कार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष, डॉ. सायरस एस. पूनावाला यांना प्रदान केला. बायोफार्मास्युटिकल इनोव्हेशन आणि जागतिक आरोग्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. हा फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबईने डॉ. के. अंजी रेड्डी यांच्या स्मरणार्थ स्थापन केला आहे, ज्यांनी भारतीय औषध उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा पुरस्कार २१ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे येथे स्वराज्य संग्राम पुरुष बचत गट पंचवार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. सध्या ग्रामीण महाराष्ट्रा मध्ये महिला बचत गट ही संकल्पना असून त्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी हे गट कार्यरत असतात या माध्यमातून सरकार उद्योग व्यवसायिकांना अर्थ पुरवठा उपलब्ध करून देत असते. तोच धागा पकडून पुरुष बचत गटाची सुरुवात केली आणि त्यातून अनेक उद्योग व्यवसायांना अर्थ पुरवठा उपलब्ध झाला. स्वराज्य संग्राम पुरुष बचत गटाचे अध्यक्ष संदीप कोकाटे, उपाध्यक्ष परशुराम मदनुर खजिनदार रमेश खंडागळे यांच्यासह अनेक सभासद या मिटींगला उपस्थित होते. यावेळी सर्वांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांची पुढील पाच वर्षा साठी…

Read More