स्वराज्य संग्राम – लवकरच अर्थवाहिनी म्हणून काम करेल


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे येथे स्वराज्य संग्राम पुरुष बचत गट पंचवार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. सध्या ग्रामीण महाराष्ट्रा मध्ये महिला बचत गट ही संकल्पना असून त्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी हे गट कार्यरत असतात या माध्यमातून सरकार उद्योग व्यवसायिकांना अर्थ पुरवठा उपलब्ध करून देत असते. तोच धागा पकडून पुरुष बचत गटाची सुरुवात केली आणि त्यातून अनेक उद्योग व्यवसायांना अर्थ पुरवठा उपलब्ध झाला.



स्वराज्य संग्राम पुरुष बचत गटाचे अध्यक्ष संदीप कोकाटे, उपाध्यक्ष परशुराम मदनुर खजिनदार रमेश खंडागळे यांच्यासह अनेक सभासद या मिटींगला उपस्थित होते. यावेळी सर्वांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांची पुढील पाच वर्षा साठी फेरनिवड करण्यात आली. तसेच अनेक विधायक ठराव यावेळी पास करण्यात आले यापुढे दरवर्षी 26 जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचा महत्त्वाचा ठराव पास झाला.

यावेळी स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड, उपाध्यक्ष सुरज कुलकर्णी यांच्या सह, योगेश मोटे, विनायक जाधव, महेश घोरपडे, रंणजीत पाटील, शिवबा कांबळे, अक्षय झावरे, अमित खंडागळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता करत असताना देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना महेश म्हणाले की, *”स्वराज्य संग्राम पुरुष बचत गट हा लवकरच अर्थवाहिनी म्हणून ओळखला जाईल.” सुरज कुलकर्णी म्हणाले की, *”आर्थिक आणि सामाजिक शिस्त स्वराज्य संग्राम ची ओळख आहे.”
यावेळी सत्कार ला उत्तर देताना रमेश खंडागळे म्हणाले की, “नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे घोडदौड शक्य झाली.” कार्यक्रमाच्या शेवटी संदीप कोकाटे म्हणाली की, ” यापुढे देखील सभासदांच्या हिताला कटिबद्ध राहून काम करू.”








