डॉ. सायरस एस. पूनावाला यांना ICT मुंबईकडून दुसऱ्या डॉ. के. अंजी रेड्डी मेमोरियल फेलोशिप फॉर अफोर्डेबल बायोफार्मास्युटिकल्सचा नामांकित पुरस्कार प्रदान


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) यांनी त्यांच्या प्रमुख उपक्रम ‘मुंबई बायोक्लस्टर’ अंतर्गत, दुसऱ्या डॉ. के. अंजी रेड्डी मेमोरियल फेलोशिप फॉर अफोर्डेबल बायोफार्मास्युटिकल्स हा मानाचा पुरस्कार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष, डॉ. सायरस एस. पूनावाला यांना प्रदान केला. बायोफार्मास्युटिकल इनोव्हेशन आणि जागतिक आरोग्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. हा फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबईने डॉ. के. अंजी रेड्डी यांच्या स्मरणार्थ स्थापन केला आहे, ज्यांनी भारतीय औषध उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



हा पुरस्कार २१ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल रिट्झ कार्लटनमध्ये झालेल्या विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. आर. ए. माशेलकर उपस्थित होते. या समारंभाचे संयुक्तपणे आयोजन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने केले. या समारंभात प्रा. अणिरुद्ध बी. पंडित, कुलगुरू, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई आणि मा. चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना डॉ. सायरस एस. पूनावाला म्हणाले, “मला मिळालेल्या सर्व पुरस्कारांपैकी डॉ. के. अंजी रेड्डी मेमोरियल पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे, कारण तो परवडणाऱ्या औषधांच्या महत्त्वाला अधोरेखित करतो. जागतिक उत्पादकांप्रमाणे ज्यांना सरकारकडून अब्जोंची आर्थिक मदत मिळाली, त्यामध्ये आम्ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये केवळ आपल्या स्वतःच्या बचतींवर आणि संसाधनांवर अवलंबून राहून कोविड-१९ लस जलद गतीने तयार केली. आम्ही लसच्या सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी मोठा वैयक्तिक आणि आर्थिक धोका घेतला, आणि लायसन्स मिळण्याआधीच आम्ही स्वतः लसीचे प्रारंभिक डोस घेतले होते.”
या कार्यक्रमादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत (दादा) पाटील, म्हणाले,
“डॉ. पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांनी स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करणारी लस विकसित करण्याच्या दिशेने घेतलेली पुढाकार अतिशय महत्त्वाची आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आपले सरकार लवकरच एक मोहिम राबवण्याचा विचार करत आहे. जसे भारताने पोलिओमुक्ती मिळवली, तसेच आपल्या देशातील महिलांवर कर्करोगाचा धोका दूर करण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. सायरस पूनावाला आणि त्यांच्या समर्पित टीमने या दिशेने चालवलेल्या अथक प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर म्हणाले, “डॉ. सायरस एस. पूनावाला हे ‘जिवंत आख्यायिका” आहेत, जे डॉ. के. अंजी रेड्डी यांच्या दृष्टीकोन आणि तत्त्वांशी सुसंगत आहेत आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे माजी विद्यार्थि देखील आहेत. जसे डॉ. रेड्डी यांनी रेड्डी लॅब्सची स्थापना केली आणि औषध क्षेत्रात एक शाश्वत वारसा निर्माण केला, तसेच डॉ. पूनावालांचे वारसा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मार्फत जागतिक आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून जीवनरक्षक लसींना परवडणारे आणि जगभरातील लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे.”
समारंभाच्या निमित्ताने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई चे कुलगुरू, प्रा. ए. बी. पंडित, यांनी सांगितले, “मुंबई बायोक्लस्टर ही एक संस्था आहे जी (ICT) च्या परिसराजवळ स्थापित आहे. सध्या तेथे अनेक औषधे आणि औषधांचे उत्पादन सिंथेटिक रासायनिक पदार्थांचा वापर करून केले जाते. परंतु, नैसर्गिक पद्धतीने त्यांचे उत्पादन केल्यास दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. हे पायाभूत संशोधन बायोक्लस्टरमध्ये, अनेक प्रमुख औषध कंपन्यांच्या सहाय्याने करण्यात येईल.”
डॉ. रत्नेश जैन, संस्थापक, मुंबई बायोक्लस्टर यांनी सांगितले, “इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई यांच्या नेतृत्वाखालील मुंबई बायोक्लस्टर हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे, जो शैक्षणिक संस्था, उद्योग आणि धोरणनिर्मात्यांना जोडतो. तसेच सहकार्याला प्रोत्साहन देत, हा उपक्रम बायोफार्मास्युटिकल इनोव्हेशनसाठी प्रेरणादायी शक्ती ठरतो, स्टार्टअप्सला सक्षम करून परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपायांच्या विकासाला गती देतो, ज्यामुळे भारताची जागतिक बायोफार्मा क्षेत्रातील स्थान मजबूत होते. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) आणि आमच्या प्रमुख मुंबई बायोक्लस्टरमध्ये डॉ. पूनावालांना हा योग्य सन्मान प्रदान करणे एक मोठे गौरवाचे बाब आहे. आम्ही त्यांना आपले मानून आणि एक प्रेरणादायक माजी विद्यार्थी म्हणून खूप गर्वित आहोत.”
दुसऱ्या डॉ. के. अंजी रेड्डी मेमोरियल फेलोशिपच्या पुरस्कार सोहळ्याचा क्षण हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, जो डॉ. पूनावाला यांच्या कार्याचा आणि जागतिक आरोग्यासाठी त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाचा उत्सव साजरा करणारा होता. हा सन्मान बायोफार्मास्युटिकल क्षेत्रात विज्ञान, नवकल्पना आणि नेतृत्व यांना प्रोत्साहन देण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई यांच्या कटिबद्धतेला अधोरेखित करतो. जागतिक आरोग्य क्षेत्रातील डॉ. सायरस एस. पूनावालांचे विलक्षण योगदान भारताला परवडणाऱ्या लसींचे केंद्र म्हणून स्थापन करण्यास कारणीभूत ठरले आहे, ज्यामुळे जगभरातील अब्जावधी जीव वाचवले गेले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे दूरदृष्टी असलेले अध्यक्ष म्हणून डॉ. पूनावालांनी नवकल्पना आणि अथक समर्पणाने परिवर्तन घडवून आणले आहे. दरवर्षी १७० हून अधिक देशांमध्ये १.५ अब्ज लसींचे वितरण करणारी त्यांची असाधारण वारसा आणि कोविड-१९ महामारीविरुद्धच्या लढ्यातील त्यांची निर्णायक भूमिका त्यांच्या नेतृत्व आणि मानवतेसाठीच्या कटिबद्धतेचे शाश्वत उदाहरण आहे.








