- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ७६ वा प्रजासत्ताकदिन पिंपरी न्यायालयात पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी १९५० मध्ये संविधान स्वीकारून भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून नावारूपास आला. पिंपरी न्यायालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ही पोलीस बांधवांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन केली. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उपस्थित असणारे सर्व न्यायाधीश, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सर्व वकील, सरकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि उपस्थित नागरिक यांच्यामार्फत भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी मोरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील ताम्हीनी गावांमध्ये आदिवासी कातकरी वस्तीवर जाऊन तेथील ३५ महिलांसोबत हळदीकुंकू समारंभाचे अवचित्य साधून गरजू महिलांना साडी साखर लहान मुलांना बिस्कीट पुढे इत्यादींचे वाटप केले.तसेच त्या वस्तीवरील ५५ लहान मुले महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप केले यासाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवडगाव सप्तशृंगी मेडिकल काळेवाडी यांनी औषधांची मदत केली. आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर मृणाल फोंडेकर यांनी मदत केली. या कार्यक्रमाचे संयोजन सुनिता गायकवाड,प्रिया पुजारी, संध्या स्वामी, सायली सुर्वे,रूपाली कड, दिपाली ओव्हाळ, मोहिनी सुर्यवंशी, सुनंदा…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुला -मुलींची शाळा आभिराज फाउंडेशन वाकड येथे झेंडावंदन व विविध कार्यक्रम संपन्न झाले वूई टुगेदर फाउंडेशन वतीने नेहमीच या दिव्यांग फाउंडेशनला श्यक्य ती वेगवेगळी मदत केली जाते या वेळी वूई टुगेदर फाउंडेशनच्या सचिव मंगला डोळे – सपकाळे, व्यावसाईक मारुती हाके कु.जफीरा सय्यद यांच्या सहकार्याने आभिराज फाउंडेशनच्या मुला – मुलींना,पालकांना,शिक्षक वर्गाला,व उपस्थित मान्यवर व नागरिकांना एनर्जी ड्रिंक(ORS)लिक्विड व बिस्कीट वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बच्चे, मा.अध्यक्ष सलीम सय्यद,सचिव जयंत कुलकर्णी,खजिनदार दिलीप चक्रे,रोटरी क्लब अध्यक्ष रवींद्र काळे,धनंजय मांडके आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणे ही पालकांची तारेवरची कसरत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील पांढरे, मुख्य अभियंता अशोक भालकर, रीनाज पठाण, वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, सह आयुक्त हिम्मत खराडे, डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून , उत्साहात साजरा करण्यात आला. पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जग्गनाथ काटे , मेजर डी वाय एस पी श्री अनिल पवार , पोलीस हवालदार श्रीराम लहाटे, माजी सैनिक विनायक शिंदे , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे , आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष राजेंद्र नाथ जसवाल या मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा प्रदान करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “प्रजासत्ताक दिन हा भारताच्या लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -संविधानाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मुल्ये जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. तत्पुर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘हिंदवी प्रजासत्ताक’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंसारख्या हजारो क्रांतिकारकांचे बलिदान कायम स्मरणात ठेवा!’ असा संदेश लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या अध्यक्ष नंदिता देशपांडे यांनी रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी दिला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना नंदिता देशपांडे बोलत होत्या. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय लंके, दीपा लंके, रोटरी क्लब ऑफ थेरगावचे अध्यक्ष दत्तात्रय कसाळे, महेश खामकर, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे विनय देशपांडे, विनायक केळकर, जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियादर्शिनी गुरव,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रयत विद्यार्थी विचार मंच संपर्क कार्यालयात डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर ग्रंथालयाचे उद्घाटन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे अध्यक्ष धम्मराज साळवे व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, भारताचे संविधान हे ‘संविधान समिती’ने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजेच स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी औंधकॅम्प येथील २४ मराठा लाईट इन्फन्त्री कमांडर हवालदार बाबुराव धुमाळ, शिपाही पावणेंद्र शुकला, माजी नगरसेविका निर्मला कुटे , संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव , एम.बि कॉम्प्युटर प्रोप्रायटर मोहन भालेराव , उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, प्रमुख पाहुणे, शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक पस्थित होते. यावेळी तिसरी आणि पाचवीचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे गीतवर नृत्य सादर केले. तसेच खुशबू सिंग , मनीषा चौधरी , राजवीर चौधरी , तेजस गायकवाड, ज्ञानेश्वरी काटे…
