प्रजासत्ताक दिनानिमित्त आभिराज फाउंडेशनच्यावतीने विविध कार्यक्रम

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुला -मुलींची शाळा आभिराज फाउंडेशन वाकड येथे झेंडावंदन व विविध कार्यक्रम संपन्न झाले
वूई टुगेदर फाउंडेशन वतीने नेहमीच या दिव्यांग फाउंडेशनला श्यक्य ती वेगवेगळी मदत केली जाते या वेळी वूई टुगेदर फाउंडेशनच्या सचिव मंगला डोळे – सपकाळे, व्यावसाईक मारुती हाके कु.जफीरा सय्यद यांच्या सहकार्याने आभिराज फाउंडेशनच्या मुला – मुलींना,पालकांना,शिक्षक वर्गाला,व उपस्थित मान्यवर व नागरिकांना एनर्जी ड्रिंक(ORS)लिक्विड व बिस्कीट वाटप करण्यात आले.
फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बच्चे, मा.अध्यक्ष सलीम सय्यद,सचिव जयंत कुलकर्णी,खजिनदार दिलीप चक्रे,रोटरी क्लब अध्यक्ष रवींद्र काळे,धनंजय मांडके आदी उपस्थित होते.
दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणे ही पालकांची तारेवरची कसरत असते तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना योग्य शिस्त लावणे ही शिक्षकांची कसरत असते या सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस खूप छान प्रगती होताना दिसत आहे ही आनंदाची बाब आहे या दिव्यांग मुलांमध्ये येऊन त्यांचा सहवास व मदत करण्याचा योग म्हणजे पुण्यच मिळते असे वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश प्राप्त केले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
दिव्या वाजपेयी,रोहित शेणाये,लायन कोकणे,अशोक बनसोडे,या मान्यवारांनी मनोगत व्यक्त केले.
दिव्यांग मुला मुलींनी देशभक्ती ची अनेक गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले.
अभिराज फाउंडेशन डायरेक्टर रमेश मुसुडगे, स्वाती तांबे यांनी सर्व प्रमुख मान्यवर,पालक वर्ग,नागरिकांचे स्वागत व आभार मानले.
वैशाली खेडेकर,रुपणाळकर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले













