राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
स्वातंत्र्य वीरांच्या निःस्वार्थ त्यागानेच, भारत देश महान - योगेश बहल


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, भारताचे संविधान हे ‘संविधान समिती’ने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.



जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजेच स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली असून प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाप्रती व राष्ट्रध्वजाप्रती स्वाभिमान – अभिमान असला पाहिजे, भारत देश सध्या प्रगतीपथावर जात असताना, पर्यावरणाचे समतोल राखण्याच्या तसेच भावी पिढीला पोषक व सुरक्षित वातावरण देण्याच्या अनुषंगाने आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे आहे, त्यामध्ये पाण्याचा वापर जपून करणे, प्लास्टिकचा वापर न करणे, स्वच्छता ठेवणे, वृक्ष संवर्धन करणे, पाणी आडवा-पाणी झिरवा, शक्य असल्यास झाडे लावणे असे पर्यावरण उपयोगी उपक्रम आपण सर्वांनी जागृक नागरिक म्हणून हाती घेणे गरजेचे आहे, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. कार्यक्रमात सर्वांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट,माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष्ज्ञ फजल शेख, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मोहंम्मद पानसरे, पंडीत गवळी, सतिश दरेकर,माजी सभापती विजय लोखंडे, गोरक्षनाथ पाषाणकर, मायला खत्री, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप,विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसुफ कुरेशी, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, व्हीजेएनटी सेल अध्यक्ष राजू लोखंडे,निर्मला माने, अकबर मुल्ला, प्रमोद साळवे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, शोभा पगारे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, अक्षय माछरे, शहर उपाध्यक्ष धनाजी विनोदे, शक्रुल्ला पठाण, अमोल भोईटे, गोरोबा गुजर, सतीश क्षीरसागर, संपत पाचुंदकर, सुप्रिया सोळंपुरे, दीपक साकोरे, बाळासाहेब पिल्लेवार, सतीश सूर्यवंशी, महेश माने, निखिल सिंह, शहाजी अत्तार, अविनाश शेरेकर, विजय दळवी, राजू क्षीरसागर, प्रदीप गायकवाड, जियाउद्दीन नागोर, शंकर पल्ले, राजू चांदणे, कुमार कांबळे, किशोर गुरव, रवींद्र सोनवणे, तुकाराम बजबळकर, राजेंद्र म्हेत्रे, चंद्रम हालगी, अशोक मोरे, सचिन दोनगहू, रमजान सय्यद, दासाहेब माने, कैलास पाटील, मनीष शेडगे, यश बोथ, अवधूत कदम, पुष्पा शेळके, वंदना कांबळे, वर्षा शेडगे, मीरा कदम, महादेवी सोनार, देवी थोरात, वैष्णवी जगताप, प्रशांत महाजन, उदय ववले, हनुमंत ताकभाते, योगेश सागरे, विजय डोंगरे, धनाजी तांबे, गणेश हरजुळे,सुनिल आडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.








