- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे स्वच्छतेचे महत्व आणि महात्मा गांधी यांचे विचार पथनाट्यातून जनजागृती म्हणून सादर करण्यात आले. ओला सुका हा कचरा, विलगीकरणं करू या! पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या! असे म्हणत पथनाट्याला सुरुवात झाली… पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड,सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे आणि महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत डॉ. पी. एस. आगरवाल यांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींसाठी जोडी जमवा वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ०२ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा मेळावा तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जोडी जमवा वधू – वर सूचक मंडळाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर यांनी दिली. मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळते. या मेळाव्यामध्ये युवक – युवतींना आयुष्याचा…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने वाकड, ताथवडे, पूनावळे आणि परिसरातील नागरिकांसाठी विशेष आधार दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी आपल्या आधार कार्डमधील त्रुटी दूर करून आवश्यक अद्ययावत करण्यासाठी याचा लाभ घेतला. या शिबिरात नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर सुधारणा, तसेच बायोमेट्रिक अपडेट आणि नवीन आधार नोंदणी अशा महत्त्वपूर्ण सेवा पुरविण्यात आल्या. विशेषतः ज्या नागरिकांना वेळेअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे आधार अपडेट करणे कठीण जात होते, अशा नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले. विशालभाऊ वाकडकर यांनी सांगितले की, “आधार कार्डमध्ये अचूक माहिती असणे नागरिकांसाठी आवश्यक आहे. शासकीय आणि…
एका दिवसात ७ आत्महत्या वेदनादायी . पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड परिसर आणि पुणे जिल्ह्यातील विभागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सुमारे सात नागरिकांनी एकाच दिवशी आत्महत्या करत जिवन संपवले हे अत्यंत वेदनादायी आहे. अनेक दिवसापासून महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटे यासह अनेक प्रश्न आहेत मात्र टोकाचे पाऊल घेऊन आत्महत्या करणे हे त्यावर समाधान होऊ शकत नाही . चर्चेतून, समुपदेशातून उत्तर व समाधान मिळेल जीवन अनमोल आहे आत्महत्यासारखा टोकाचा विचार टाळावा असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे की कोरोनापासून अनेकांच्या व्यवसायामध्ये,उद्योगांमध्ये, नोकरीमध्ये अनेक संकटे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्र आणि राज्य सरकार मिळून पहिल्या टप्प्यामध्ये २५ कोटी प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांच्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार असून मागणीवर आणि वेळेवर आधारित किंमत ठरवली जाणार आहे यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार असून स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या नव्हे तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे याला विरोध करण्यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड, ज्ञानेश्वर उबाळे, सलीम डांगे,अनिल शिंदे,सुनील जाधव, मनोज बावस्कर, रत्ना पाटील, आश्विनी हातागळे,सविता तळेकर, वनिता चव्हाण,मंदाकिनी कांबळे आदी उपस्थित होते. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औद्योगिकनगरीमध्ये विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या लघुउद्योजकांवर अनधिकृत कारवाईचे संकेत दिले आहेत. महापालिकेने चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, जाधववाडी या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आवाहन केले आहे. १५ दिवसांत आपली बांधकामे काढून घेण्याविषयी महापालिकेने कळवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले उद्योग बंद पडले तर अनेकांचा रोजगार बुडेल, अशी भावना उद्योजक व्यक्त करत आहेत. तसेच ही कारवाई थांबवण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे. दरम्यान, पायाभूत सुविधांप्रमाणेच विजेच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या उद्योजकांना आता या नव्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने पाठवलेल्या नोटीसनंतर पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पवारवस्ती,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे निदान करण्यासाठीची ‘एनसीव्ही’ चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी, वाकड, भोसरी, पिंपळेगुरव, चिखली, तळवडे या भागात रुग्ण आढळले आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत. विहिरी, बोरवेल, टँकर मार्फत पिण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्याचे ‘क्लोरीन’ तपासले जाणार आहे. शहरातील खासगी रुग्णालयांकडे ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ इंजेक्शन नसल्यास त्यांनी गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांना दाखल करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळेगाव दाभाडे येथील युवा आर्किटेक्ट इंद्रजीत आवारे यांनी लाइटिंग डिझाइन, लँडस्केप डिझाइन, साइट नियोजन आणि डिझाइन, हार्डस्केपिंग आणि सॉफ्टस्केपिंग, गार्डन डिझाइन, पर्यावरणपूरकता या गोष्टींनी युक्त मांडलेल्या बांधकाम विषयक संकल्पनांची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या आदरातिथ्य प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पाला नुकताच नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरियर एक्सेलन्सच्या वतीने ‘ट्रस्टेड अँड रायजिंग क्रिएटिव्ह आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन फर्म ऑफ द इयर 2025’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच हिंजवडीस्थित उभारलेल्या ‘अकासा’ या दिवसा व रात्री वैविध्यपूर्ण अनुभव देणाऱ्या ‘पूल, बार आणि रेस्टॉरंट’च्या उभारणीबद्दल आर्किटेक्ट आवारे यांना नुकतेच ‘टाईम्स हॉस्पिटॅलिटी आयकॉन अवार्ड’ने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक मधील मुले आणि मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. झील पॉलिटेक्निक, पुणे येथे झालेल्या मुले व मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेत विजेत्या संघांना प्रो. निलेश कोकरे, प्राचार्य आयुब तांबोळी, समन्वयक प्रा. अमोल चांदारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक मुले, मुलींच्या स्पर्धेमध्ये झील पॉलिटेक्निक संघाने मिळवला. यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. शिंदे जयश्री, मयुरी देशमुख, डॉ. एम. एस. पवार, संजय शिरोडे, क्रीडा समन्वयक सुनिल जगताप,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमी प्राथमिकता देत असून वेळोवेळी त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्येक्त केले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे स्वच्छ्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत…
