अनमोल जिवन संपवू नका – काशिनाथ नखाते


एका दिवसात ७ आत्महत्या वेदनादायी .


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड परिसर आणि पुणे जिल्ह्यातील विभागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सुमारे सात नागरिकांनी एकाच दिवशी आत्महत्या करत जिवन संपवले हे अत्यंत वेदनादायी आहे. अनेक दिवसापासून महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटे यासह अनेक प्रश्न आहेत मात्र टोकाचे पाऊल घेऊन आत्महत्या करणे हे त्यावर समाधान होऊ शकत नाही . चर्चेतून, समुपदेशातून उत्तर व समाधान मिळेल जीवन अनमोल आहे आत्महत्यासारखा टोकाचा विचार टाळावा असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे की कोरोनापासून अनेकांच्या व्यवसायामध्ये,उद्योगांमध्ये, नोकरीमध्ये अनेक संकटे निर्माण झाली, सध्याची बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असून अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत यात काही कामगार बांधव आहेत . अशा स्थितीमध्ये आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही आत्महत्या नंतर त्यांच्यावर अवलंबित असणारे कुटुंबीयांचे जीवन संकटात येते.
ज्या वेळेला निराशा येथे अशा वेळेला मित्र,नातेवाईक ,जवळचे स्नेही अशा लोकांशी चर्चा करावी त्यातून मार्ग नक्की निघू शकतो मात्र आत्महत्या हा पर्याय कदापि होऊ शकत नाही जीवन अनमोल आहे आणि हे संघार्षसह चांगल्या रीतीने जगण्याचा विचार मनात ठेवून संघर्षाची मानसिक तयारी करावी असे आवाहन नखाते यांनी केले आहे.










