ताज्या घडामोडीपिंपरी

आर्किटेक्ट इंद्रजीत आवारे यांच्या आदरातिथ्य आणि व्यावसायिक प्रकल्पाला नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरियर एक्सेलन्सचा पुरस्कार जाहीर 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळेगाव दाभाडे येथील युवा आर्किटेक्ट इंद्रजीत आवारे यांनी लाइटिंग डिझाइन, लँडस्केप डिझाइन, साइट नियोजन आणि डिझाइन, हार्डस्केपिंग आणि सॉफ्टस्केपिंग, गार्डन डिझाइन, पर्यावरणपूरकता या गोष्टींनी युक्त मांडलेल्या बांधकाम विषयक संकल्पनांची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या आदरातिथ्य प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पाला नुकताच नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरियर एक्सेलन्सच्या वतीने ‘ट्रस्टेड अँड रायजिंग क्रिएटिव्ह आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन फर्म ऑफ द इयर 2025’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
         याबरोबरच हिंजवडीस्थित उभारलेल्या ‘अकासा’ या दिवसा व रात्री वैविध्यपूर्ण अनुभव देणाऱ्या ‘पूल, बार आणि रेस्टॉरंट’च्या उभारणीबद्दल आर्किटेक्ट आवारे यांना नुकतेच ‘टाईम्स हॉस्पिटॅलिटी आयकॉन अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
         स्थापत्यकलेचे सखोल ज्ञान असलेले इंद्रजीत आवारे यांचे डिझाइन हे टिकाऊ आणि गांभीर्यपूर्ण  आर्किटेक्चरभोवती केंद्रित आहे. ते करीत असलेल्या प्रोजेक्टवरून असे दिसते, की त्यातून त्यांनी ठरवलेला उद्देश साध्य होत आहे. त्यांची अविन्या आर्किटेक्ट ही आर्किटेक्चरल डिझाईन फर्म आहे; जी आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाइन आणि लँडस्केप डिझाइनमध्ये आघाडीवर आहे.
          याबाबत बोलताना इंद्रजीत आवारे यांनी सांगितले, की आम्ही प्रेरणादायी आणि परिवर्तनशील प्रकल्प निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. प्रत्येक प्रकल्पाची सुरुवात क्लायंटच्या गरजा, आकांक्षा आणि साइटच्या संभाव्यतेची पूर्ण माहिती घेऊन होते. आम्ही आधुनिक डिझाइन तत्त्वे पारंपरिक आणि प्रादेशिक बारकाव्यांसह मिश्रित करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक डिझाइन ही अद्वितीय आणि संदर्भानुसार समृद्ध बनवतो. सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक प्रकल्प तयार करण्याला नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button