प्रीपेड विज मीटर ग्राहकांच्या नव्हे कंपन्याच्या फायद्याचे – काशिनाथ नखाते


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्र आणि राज्य सरकार मिळून पहिल्या टप्प्यामध्ये २५ कोटी प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांच्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार असून मागणीवर आणि वेळेवर आधारित किंमत ठरवली जाणार आहे यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार असून स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या नव्हे तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे याला विरोध करण्यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.


यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड, ज्ञानेश्वर उबाळे, सलीम डांगे,अनिल शिंदे,सुनील जाधव, मनोज बावस्कर, रत्ना पाटील, आश्विनी हातागळे,सविता तळेकर, वनिता चव्हाण,मंदाकिनी कांबळे आदी उपस्थित होते.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे वीज मीटर ग्राहक यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कामगार वर्ग सर्वसामान्य नागरिक यांना या स्मार्ट मीटरमुळे फायदा होईल असा दावा सरकार व संबंधित कंपन्या करीत असल्या तरी ते नुकसानकारक ठरणार आहे. ग्राहकांना वीज वापरण्यापूर्वी आगाऊ पैसे भरावयाचे असल्याने तेथे जमा झालेले हजारो कोटी रुपये संबंधित कंपन्यांचा नफा करणारे आहेत. वास्तविक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जनतेचा पैसा खर्च झाला पाहिजे मात्र कार्पोरेट आणि कार्पोरेट्स कंपन्यांसाठी हा पैसा वापरून देऊन त्यांना नफा मिळवून देण्याची योजना आणली जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या महावितरणच्या बिला पेक्षा अधिक पटीने जास्त बिल म्हणजे पुढील कालावधीत येणार आहेत अशा प्रकारचे चित्र ज्या ठिकाणी यापूर्वी असे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत तेथे दीड पट ते दुप्पट बिल वाढवून येत आहे खाजगी कंपन्यांची मनमानी होणार आहे विद्युत निर्मिती कंपन्यांचे खासगीकरण यापूर्वीच ५० % पर्यंत गेलेले आहे पुढील कालावधीमध्ये ते अधिक झाल्यास त्याचा बोजा ग्राहकावरती पडणार आहे वीज ही मूलभूत गरज असल्याने स्मार्ट सीटर सारख्या योजना आणून खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचे साधन बनवण्यापेक्षा आहे त्या स्थितीमध्ये वीज आणि विद्युत वितरण व्यवस्था बळकट करावी न केल्यास याबाबत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा नखाते यांनी दिला.










