- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीए महाविद्यालयात दिनांक २९/०१/२०२५ रोजी “आर्ट ऑफ लिविंग” या विषयावर श्री.सौरभ रत्नाकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री.रत्नाकर यांनी प्राणायाम-योगसाधना याची दैनंदिन जीवनातील गरज सांगून, याचे विद्यार्थी जीवनात होणारे सकारात्मक परिणाम हे विद्यार्थ्याना सांगितले. यावेळी अनुराधा पोखरकर व हेमंत पवार यांनी योग साधनेचे त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साह दर्शवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी वैभवी…
– नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंद्रायणी थडी महोत्सवात स्टॉल मिळवण्यासाठी बचतगटांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यंदा 2 हजार स्टॉल उभारण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत 3 हजार 700 हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल वाटप करण्यात येईल, अशी माहिती नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांनी दिली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या हेतूने इंद्रायणी थडी महोत्सवाचे आयोजन केले…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने “मध्यस्ती जनजागृती कार्यक्रमाचे” आयोजन पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचे फुलांचे रोपटे देत स्वागत करून करण्यात आली. याप्रसंगी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. एन. आर. गजभिये, न्यायाधीश श्री. एम. जी. मोरे, श्रीमती. एस.एस. चव्हाण, श्री. एन. एन. गवळी, श्रीमती. टी. एस. महाडिक, श्री. बी. डी. चोखट, श्री. व्ही. एस. गायकवाड, श्रीमती. पी. डी. पाटील,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व 9309445824/9325848115 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. चौकट – कोणत्याही लिंकद्वारे कोणतेही ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका! तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत, तुम्ही माहिती बदल करण्यासाठी सदर ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठीचे एसएमएस तुमच्या व्हाट्सअपवरती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स यांच्या वतीने आज 8 व्या युवा संसद चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जाधवर ग्रुप च्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल “आदर्श नगरसेवक” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल जाधवर ग्रुप चे नाना काटे यांनी आभार व्यक्त केले. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स चा वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याचे देखील नाना काटे यांनी कौतुक केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड,मा. मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख,आमदार अमित गोरखे,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची पारंपरिक माघी रथयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. श्री मोरया गोसावी महाराजांनी सुमारे ५२६ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही यात्रा अखंडपणे सुरू असून, यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी ८ फेब्रुवारीला चिंचवड येथे परतणार आहे. चिंचवड येथील गाणपत्य संप्रदायातील महान संत श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांना सन १४८९ मध्ये मोरगावच्या पवित्र श्री गणेश कुंडातून प्राप्त झालेले श्री मंगलमूर्ती माघ महिन्यात मोरगाव येथे नेण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा गेल्या ५२६ वर्षांहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे. यावर्षीही, चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – घरेलू कामगार हा महत्त्वाचा घटक असून घरेलू कामगारांचे हक्काचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारा कायदा करा याबाबत कायदेशीर नियमावली बनवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आणि सहा महिन्यात अहवाल करण्याचे निर्देश मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत आणि उज्वल भूयान यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिले या निर्णयामुळे अनेक घरेलू कामगारांना लाभ होणार असून या निर्णयाचे स्वागत आज घरेलू कामगारांनी एकमेकांना साखर देऊन या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती,कष्टकरी संघर्ष महासंघ आणि कष्टकरी संघर्ष घरेलू कामगार महासंघातर्फे या निर्णयाचे चिंचवड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, मनीषा चंदनशिवे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 77 व्या स्मृतिदिनानिमित्त आज मोरवाडी पिंपरी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी सध्या देशभर काँग्रेस कडून संविधान रक्षणासाठी आणि संविधानाबाबत जनजागरणासाठी सुरू केलेला जय बापू, जय भीम, जय संविधान या अभियानांतर्गत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन आणि अहिंसेची शपथ सामूहिक स्वरूपात घेण्यात आली. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी संविधानाबाबतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये जनजागरण करीत उपक्रम आगामी काळात शहरभर राबवणार असल्याचा संकल्प केला. पत्रके वाटप, जनसभा, समूह सभा, युवा संवाद, गृहिणी संवाद, विविध स्पर्धा तसेच दृकश्राव्य माध्यमातून प्रचार करत अशा व इतरही विविध पद्धतीच्या उपक्रमाद्वारे संविधानाचे जनसामान्यांना असणारे…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ( स्वायत्त) आकुर्डी येथे समर्थ भारत अभियान योगदान कार्यशाळा विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अंतर्गत पार पडली. तीन सत्रात वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्याते. प्रा. प्रदीप कदम यांनी प्रथम सत्रात युवक आणि कौशल्य विकास यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कौशल्यातून सक्षम तरुण निर्माण होऊ शकतो.” दुसऱ्या सत्रात डॉ. गणेश ढवळे यांनी आत्मनिर्भर युवक या विषयावर “विद्यार्थी व तरुणांच्या आत्मनिर्भरतेत राष्ट्राचे हित आहे” असे सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर तृतीय सत्रात मा. विजय गोरडे यांनी आधुनिक युवक व तांत्रिक कौशल्य यावर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सुजाता हरेश नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार तिवारी यांनी ही नियुक्ती केली आहे. संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अनिता वर्मा यांच्या हस्ते सुजाता नखाते यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कांचन मोटघरे यादेखील उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय संघटना मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण ही संघटना देशातील मानवी हक्कांचे रक्षण, प्रचार आणि अंमलबजावणीसाठी कार्य करते. समाजात मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन रोखणे व नागरिकांमध्ये अन्यायाविरोधात जागरूकता वाढविणे हे…
