सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने घरेलु कामगार कायदा करावा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे घरेलू कामगारांनी साखर वाटून केले स्वागत


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – घरेलू कामगार हा महत्त्वाचा घटक असून घरेलू कामगारांचे हक्काचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारा कायदा करा याबाबत कायदेशीर नियमावली बनवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आणि सहा महिन्यात अहवाल करण्याचे निर्देश मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत आणि उज्वल भूयान यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिले या निर्णयामुळे अनेक घरेलू कामगारांना लाभ होणार असून या निर्णयाचे स्वागत आज घरेलू कामगारांनी एकमेकांना साखर देऊन या निर्णयाचे स्वागत केले.



महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती,कष्टकरी संघर्ष महासंघ आणि कष्टकरी संघर्ष घरेलू कामगार महासंघातर्फे या निर्णयाचे चिंचवड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, मनीषा चंदनशिवे, मिरा कांबळे, वैशालि पवार,लता गोरे, सविता शिंदे,पुजा एडके पुनम मस्के,सविता सुर्यवंशी,सुनिता पवार,अश्विनी हटके, लक्ष्मि मटके आदीसह घरेलु कामगार उपस्थित होत्या.

घरेलू कामगार हा महत्त्वाचा घटक असूनही आजपर्यंत त्यांची शासन दरबारी उपेक्षाच झालेली आहे घरेलू कामगार हे कामगार श्रेणीत येतात मात्र कामगार म्हणून हे त्यांना संबोधले जात नाही, अत्यंत कमी पगार, कामाचा दीर्घ वेळ आणि अनेक वेळा घरेलू कामगारांना चुकीची वागणूक मिळते या कामगारांना कायद्याचे संरक्षण नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचे स्पष्ट नमूद करत कायदा व अहवाल करण्याबाबत निर्देश दिले आहेत
यावेळी माधुरी जलामुलवर म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यामध्ये घरेलू कामगारांच्या अनेक समस्या आहेत, सुमारे ५० लाख घरेलू कामगार महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी किमान वेतन तसेच आरोग्याचे गंभीर आजार उपचार सुविधा असावी कोरोना पासून घरेलु कामगार अनेक संकटात आहेत.
नखाते यांनी महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगार कायदा हा निष्प्रभ करण्यात आलेला असून त्याला निधी न देता सरकार घरेलू कामगारावरती अन्याय केला आहे . सन्मानधन हे सलग सहा वर्ष कामगारांना मिळाले पाहिजे. न्यायालयीन आदेशाचे पालन करत लगेच त्वरित त्यांच्या हिताचा कायदा करावा. अन्यथा लाडक्या घरेलु कामगार बहिणी वंचित राहणार आहेत.








