- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याला सुरूवात, ३० हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत लाभ पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेला सक्षम उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या उपक्रमाचा पहिला टप्पा नुकताच संपला असून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांमध्ये चांगल्याच सुधारणा दिसून आल्या आहेत. महानगरपालिकेचे जवळपास ३० हजार विद्यार्थी या उपक्रमांचा लाभ घेत असून या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयात ‘सक्षम’ करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सक्षम उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही कौतुक केले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अनाधिकृत बांधकाम, पत्राशेडसह इतर अनाधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. गत दोन दिवसात लोणीकंद ते तुळापूर फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली तसेच इतर ठिकाणची एकूण ८७ अतिक्रमने पथकाच्या माध्यमातून निष्कासित करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही नागरिकांनी पीएमआरडीएच्या पथकाला सहकार्य करत स्वत: ची अतिक्रमने काढून घेतली. कटकेवाडी, लोणीकंद ते तुळावर फाटा रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली ३५ पत्राशेडची अतिक्रमने बुधवारी (दि.५) पीएमआरडीएच्या पथकाने निष्कासित केली. तर गुरुवारी (दि.६) तुळापूर फाटा ते पेरणे फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली ५२ अतिक्रमने काढण्यात आली. गत आठवडयाभरात सव्वा पाचशेपेक्षा अधिक अतिक्रमनावर…
सर्वसामान्य नागरिकांनी कष्टकरी कामगारांसाठी दोन्ही योजना महत्त्वाच्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेमुळे खडखडाट असून तब्बल २ लाख कोटींची तूट झाल्याचे दिसून येत असून या एक योजनेच्या लाभासाठी इतर सर्वसामान्य आणि कष्टकरी कामगारांसाठी असणाऱ्या अनेक योजना बंद करण्याचा विचार सरकार करत आहे त्यामध्ये शिवभोजन आणि आनंदाचा शिधा या योजना जर बंद विचाराधीन आहे त्या बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारने शिव भोजन थाळी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना सुरू केली महाराष्ट्रात दररोज १ लाख ९० हजार शिवभोजन थाळीचा लाभ सर्वसामान्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वसंत सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर “महिला भगिनींच्या सेवार्थ आणि सक्षमीकरणा करिता ” “कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची” स्थापना (दिनांक 4 फेब्रुवारी 2025) मंगळवार रोजी “कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची” स्थापना करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी संचालक व मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका कमल घोलप, शुभांगी बोऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे आदी उपस्थित होते. मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महिला भगिनीस मार्गदर्शन करताना सांगितले की, महासंघाच्या माध्यमातून समाजातील अनेक महिलांनी एकत्र येऊन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत. मनपा, राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे महिलांच्या सबलीकरणासाठी, स्वयंरोजगार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,वाणिज्य विभागातर्फे व्यवस्थापन सप्ताहाचे आयोजन दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित केला होता. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी डॉ. अर्चना चिरमाडे यांचे “व्यवसाय व्यवस्थापनातील नवीन प्रवाह” या विषायावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवराय व माता रमाई यांना अभिवादन करून झाली. डॉ. अर्चना चिरमाडे यांनी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या कौशल्यावर आपले मत मांडले, यामधे व्यक्तिमत्त्व, संभाषण, निर्णय यासारखे कौशल्य आपण व्यावसायिकदृष्ट्या कशी वापरावीत यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमणच्या माध्यमातून विद्यार्थी कसे विकसित होतात यावर मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे सांगितली. सदर कार्यक्रम वाणिज्य विभागाच्या…
निबे लिमिटेडच्या सुसज्ज मिसाईल व स्माॅल आर्म्स काॅम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न चाकण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने संरक्षण सज्जतेत मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडियासारख्या योजनांचा योग्य लाभ घेऊन निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस कंपनी ने संरक्षण क्षेत्रातील विविध आयुधे व उपकरणे तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय कमी वेळेत जोरदार वाटचाल केली आहे. यामध्ये कंपनीचे चेअरमन गणेश निबे यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस मोलाचा वाटा उचलण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी चाकण येथे केले. चाकण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या प्रतिमेस गीतांजली दुबे, स्वाती वक्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, शाळेच्या उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील शिक्षक अनिता रोडे, तृप्ती शर्मा, दिव्या सराफ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. “करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोट्यावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही…
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारतीच्या भुमीपूजनादरम्यान उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांनी चिमटे काढले. महेश लांडगे यांनी केलेलं एक विधान यासाठी कारणीभूत ठरलं. यानंतर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या विकासात आपला किती महत्त्वाचा वाटा आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच बोलून दाखवलं. आपलं नाव न घेण्यावरुन नाराजी जाहीर करत त्यांनी सगळा इतिहासच सांगितला. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केलं. यावेळी त्यांनी आपलं नाव न घेतल्याने अजित पवारांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. इतकंच नाही तर चांगल्याला चांगलं म्हणायला शिका अशा शब्दांत सुनावलं. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आणि अहमदनगर मधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ध्यानधारणा केंद्राचे प्रशिक्षक डॉ. दीपक हरके यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलन सोहळ्यात विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित केले होते. ध्यानधारणा क्षेत्रात जगभरात केलेल्या योगदानाबद्दल डॉ. दीपक हरके यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विशेष पाहुण्यांसमवेत या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. तसेच राष्ट्रपती भवन मधील अमृत उद्यान मध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या ऐट होम रिसेप्शन मध्ये ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत सहभागी होण्याची संधी मिळाली. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. दीपक हरके यांच्यासह त्यांचे सहकारी सूर्या भाई, गीता दीदी, सतेंदर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची ओळख आणि अनुभव मिळवून देण्यासाठी बेंगलोर येथील इसरो, आयआयएम, हिंदुस्तान ॲरोनॉटिकल लिमिटेड, ट्रीनीटी एडीटी, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सहकारी साखर कारखाना, कागल येथील आदित्य बिर्ला यांचा ग्रासीम उद्योग या विविध उद्योग समूहांना पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (एसबीपीआयएम) विद्यार्थ्यांनी भेट दिली. संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहयोगी प्रा.डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. दिलीप पवार, अनघा कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम केले. या उद्योग भेटीत विद्यार्थ्यांना उद्योगांमधल्या विविध प्रक्रिया, त्यांच्या कार्यप्रणाली यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. नवीन शिक्षण धोरण २०२०…
