Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भविष्यासाठी विद्यार्थी नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा २०२५ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एकमेव CBSE मान्यताप्राप्त शाळा आहे. या शाळेची स्थापना २०११ साली झाली आहे. प्रचिती शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नवभारत टाइम्स तर्फे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा २०२५ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी विविध निकषांवर शाळेचे मूल्यमापन करण्यात…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा देहूगाव व रूक्षदायी प्रतिष्ठान यांच्या वतीने रुक्षरोपण करण्यात आले. यावेळी खासदार बारणे यांच्यासह श्री तीर्थक्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, देहूगाव शिवसेना शहरप्रमुख सुनिल हगवणे, ह.भ.प जालिंदर महाराज मोरे, माजी नगरसेवक गणेश हगवणे, देहूगावचे भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, माजी उपसरपंच सचिन साळुंखे, शिवसेना महिला मावळ तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, शिवसेना शहर संघटिका शितल पवार, माजी उपसरपंच संतोष हगवणे व नागरिक यावेळी उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री…

Read More

एआयसी-एमआयटी-एडीटीच्या स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्रामचे यश पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शालेय विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटर (एआईसी) द्वारे अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम (एटीएल-एसआईपी) राबविला जात असून, चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र तथा छत्तीसगढमधील ९ शाळांचे १४ प्रकल्प मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. अंतिम मंजुरी नंतर सहभागी चमू आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह डसॉल्ट सिस्टम्स यांच्या साह्याने त्यांचे प्रकल्प विकसित करू शकणार आहेत. एआईसी -एमआईटी एडीटी इनक्यूबेटर फोरमच्या माध्यमातून ९ शाळांमधील १५ संघांची निवड अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राममध्ये करण्यात आली. या सर्व संघाचे अंतिम ऑनलाइन प्रकल्प सादरीकरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली येथील कुदळवाडी भागात सलग दुसऱ्या दिवशी आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आज ६८ लाख ७८ हजार चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ६०७ बांधकामांचा समावेश होता. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या राबविलेल्या या कारवाईमध्ये पहिल्या दिवशी २२२ आणि आज दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे निष्कासित करण्यात आली. आज झालेल्या कारवाईदरम्यान आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.१२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ ड‍िसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी…

Read More

रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२७ वा स्मृतीनिमित्त चर्चासत्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कामगार हा महत्त्वाचा घटक आहे देशातील आणि महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी अनेक कायदे टिकवले, कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणले जेवणाची सुट्टी, आठवड्याची सुट्टी, तसेच कामाच्या वेळा कमी करून घेतल्या मात्र आता नव्या धोरणानुसार संघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी कामगार हित संवर्धक संघटनांची गरज आहे असे प्रतिपादन कामगार प्रशिक्षक, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, बांधकाम कामगार विभाग, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघतर्फे कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आज  पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी जागतिक सूर्य नमस्कार दिवस निमित्ताने शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन व योगांजली स्टुडिओ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. आजच्या या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की आपण स्वतःसाठी एक तासही काढू शकत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसभर डेस्कवर बसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. पण योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. सूर्यनमस्कार ही सूर्याला आदर देण्याची एक प्राचीन योगिक पद्धत आहे. सूर्यनमस्कार १२ योग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा आजार पाण्यामुळं बळावतोय. पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरात ही अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. याचं जीबीएसमुळं काही रुग्ण ही दगावले आहेत. जीबीएस (गुलियन बरी सिंड्रोम) या रोगाबाबत लवकरात लवकर उपाय योजना करा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. सुशील मंचरकर यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पुणे जिल्हा व पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस (गुलियन बरी सिंड्रोम) या आजाराचा उद्रेक वाढत आहे.   पाण्याचं निर्जंतुकीकरण झालं तरी पाणी पिण्यायोग्य आहे का? याची गुणवत्ता तपासणे गरजेचं असतं. जीबीएस…

Read More

आमदार सुनील शेळके यांचा नागरी सन्मान तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जीवनात आईवडील, संत आणि भगवंत हीच प्रेमाची माणसे राहिली असून, काळाची भीती घालविण्यासाठी देवाचे नामस्मरण करा. मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊन शांत जीवन जगण्याचा प्रयत्न सर्वांनी करा. विश्वाची आई ज्ञानेश्वरी ही नेवासा येथे जन्माला आली असून, तिचे नाव घेतले की मायाही मरते, अशी ज्ञानेश्वरी जीवनात वाचा ती आत्मसात करा, असे आवाहन समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी मावळवासियांना केले. तळेगाव दाभाडे येथे सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत समाजप्रबोधनकार ह.भ.प.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच या परिसरातील अनधिकृत बांधकामे अशा एकूण २२२ बांधकामावर आज महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि विविध क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूट बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबविली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशासनाला सूचना देखील केल्या. या…

Read More