ताज्या घडामोडीपिंपरी
“जीबीएस” रोगाबाबत लवकरात लवकर उपाय योजना करा – ॲड. सुशील मंचरकर


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा आजार पाण्यामुळं बळावतोय. पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरात ही अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. याचं जीबीएसमुळं काही रुग्ण ही दगावले आहेत. जीबीएस (गुलियन बरी सिंड्रोम) या रोगाबाबत लवकरात लवकर उपाय योजना करा, अशी मागणी
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. सुशील मंचरकर यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा व पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस (गुलियन बरी सिंड्रोम) या आजाराचा उद्रेक वाढत आहे. पाण्याचं निर्जंतुकीकरण झालं तरी पाणी पिण्यायोग्य आहे का? याची गुणवत्ता तपासणे गरजेचं असतं.
जीबीएस रोग हा दूषित पाण्यामुळे होत असल्याबाबत वर्तमान प्रसिद्ध होत आहे. तसेच वैद्यकीय तज्ञानी देखील त्यांचे मत दिले आहे. महानगर पालिकेने देखील शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणे हे महानगरपालिका अधिनियमानुसार आद्य कर्तव्य आहे.त्याकरिता महानगर पालिका पाण्याचा कर पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करते. तसेच पाण्याची कमतरता झाल्यास महानगर पालिकेद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करते. ज्याअर्थी, अधिनियमाच्या हे महानगरपालिकेस शहरातही नागरिकांना पाणीपुरवठा करणे व नागरिकांचे आरोग्याची जबाबदारी हे महानगरपालिकेवर कायद्याने बंधकारक केले आहे. त्याअर्थी स्वच्छ , निरोगी
पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेचे कायदेशीर कर्तव्य आहे. तथापि, तातडीने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हाहानिकारक असल्याबाबत तज्ञानी सांगितले आहे. तरी टँकर द्वारे होणार पाणीपुरवठा थांबवावा व त्या पाण्याची तपासणी व्हावी.
तसेच शहरातील नद्यामध्ये औद्योगिक दूषित केमिकल बेकायदेशीर रित्या सोडले जाते. त्यावर
महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेचे कायदेशीर कर्तव्य आहे. तथापि, तातडीने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हाहानिकारक असल्याबाबत तज्ञानी सांगितले आहे. तरी टँकर द्वारे होणार पाणीपुरवठा थांबवावा व त्या पाण्याची तपासणी व्हावी.
तसेच शहरातील नद्यामध्ये औद्योगिक दूषित केमिकल बेकायदेशीर रित्या सोडले जाते. त्यावर
महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस (गुलियन बरी सिंड्रोम) रोगाने ग्रस्त रुग्ण मरण पावले आहेत. त्यामुळे सदर रोगाचा प्रतिबंध करण्यास महानगरपालिका असफल ठरली असल्याने मरण पावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना रक्कम
रुपया १ कोटी नुकसान भरपाई महानगर पालिकेने द्यावी. तथापि, महानगरपालिकेने त्याबाबत
तातडीने कार्यवाही करावी अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही दिला आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या रोगास कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झाला आहे. परंतु महानगरपालिका त्यावर योग्य निरीक्षण ठेवणं नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर औद्योगिक आस्थापनांवर कारवाई करावी असे ही निवेदनात म्हटले आहे.








