- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने अखिल रहाटणीगाव शिवजयंती उत्सव २०२५ आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळेवाडी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार, युवा महाराष्ट्र केसरी पहिलवान किशोर नखाते, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, युवा नेते शुभम नखाते,पि.चि.म.न.पा महापौर केसरी निलेश नखाते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली सोंडे,उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, असंख्य शिवभक्त उपस्थित होते. शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रहाटणी अशी जय शिवाजी जय भारत ह्या नावाने पदयात्रा काढण्यात आली.…
शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर चिंचवड येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगण्यात आली. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष व व्याख्याते राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ आणि वाचक वर्ग उपस्थित होता.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ०६:३० वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा २०२५, ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरि शंकर जैन आणि विधिज्ञ ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात येईल; तसेच हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे सतरावे वर्ष असून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन क्रिडांगण महादेव मंदीर, लांडगे आळी येथे दि. 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत भाविकांना कीर्तन महोत्सवाचा आनंद घेता येईल. या महोत्सवात दि. 20 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. रोहीत महाराज बोराटे (मोशी), दि. 21 फेब्रुवारी…
कुसगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ . पी. डी. पाटील सर आणि प्र.कुलगुरू मा.डॉ सौ स्मिता जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्ताने नुकतेच डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नाॅलाॅजी व बायोइन्फर्मेटिक्स काॅलेज ताथवडे येथील एन.एस.एस.विभागाच्यावतीने दर वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रति सामाजिक बांधिलकी जपत कुसगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कुसगाव जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वाचे स्वागत केले. संचालिका निलु नवाणी मॅडम व प्रकाश पाटील यांच्या हस्ते कुसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 90 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन व…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा व संस्थेच्या खजिनदार डॉ . भूपाली शहा यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या संयोजन व अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयांच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने निर्भय कन्या अभियान अंतर्गत महिलांचे स्वसंरक्षण व प्रात्यक्षिके कार्यशाळेचे उद्घाटन दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अँड. मोहिनी सूर्यवंशी, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या प्रमुख प्रा. गीता कांबळे, अवंतिका भोर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2024 – 25 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयास 501 ते 1000 विद्यार्थी संख्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ व आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील सर्वोत्कृष्ट शाळा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य कार्य गौरव सोहळा दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी मॉडर्न हायस्कूल निगडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 89 वे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि पुणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सामाजिक समरसतेचा स्त्रोत निर्माण करणारे, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे लहुजी वस्ताद साळवे होय!’ असे विचार ज्येष्ठ व्याख्यात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४४व्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग आयोजित भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात अपर्णा कुलकर्णी बोलत होत्या. पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सुरेश विश्वकर्मा, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनाचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. अशोक नगरकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी आणि वाकड या पोलिस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार आहे. या निर्णयासाठी आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड मंगेश खराबे ,सचिव रीना मगदूम ,ॲड खंदारे, ॲड कोकणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची नुकतेच शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्ताने आले असता आमदार महेश लांडगे यांच्यामाध्यमातून भेट घेतली व निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच पिंपरी-चिंचवड…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकिपीडिया या संकेतस्थळावर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, हीन दर्जाचा, दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर प्रकाशित केला आहे. आपण तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर प्रकाशित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी लेखी निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. या पत्रामध्ये पुढे म्हटले आहे की, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची माहिती हेतुपुरस्सर पसरवली जात आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास बदलून विकृतपणे मांडण्याचा प्रकार मुद्दाम केला जात आहे. त्यामुळे समस्त हिंदुस्थानातील लाखो शिव शंभू प्रेमींच्या…
