शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात कन्या विद्यालयाचे उत्तुंग यश व गुणगौरव


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2024 – 25 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयास 501 ते 1000 विद्यार्थी संख्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ व आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील सर्वोत्कृष्ट शाळा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य कार्य गौरव सोहळा दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी मॉडर्न हायस्कूल निगडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 89 वे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय भाऊसाहेब कारेकर साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.



शिक्षक आपल्या कर्तृत्वाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्याच्यातील सुजनशीलतेला वाव देत नवीन सूजान संस्कारक्षम माणूस घडविण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण जागृत करून समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयुष्यभर करत असतात. अशा सर्वांचाच समाज घडविण्यामागे सिंहाचा वाटा असतो. म्हणून म्हणून पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यालयांमध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान राबवून प्रत्येक शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम शोधण्याचा प्रयत्न केला गेला व यामध्येच कन्या विद्यालयाला उत्कृष्ट यश प्राप्त झालेले आहे . यानिमित्ताने आयोजित भव्य कार्यगौरव सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते (501ते1000या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल) कन्या विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्रक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या उत्कृष्ट यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अधिकारी श्री मोहिते सर व सहाय्यक अधिकारी श्री गायकवाड सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच कन्या विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य यांनीही या यशाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व कार्यक्रम संपन्न झाला.








