क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे लहुजी वस्ताद साळवे! – अपर्णा कुलकर्णी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सामाजिक समरसतेचा स्त्रोत निर्माण करणारे, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे लहुजी वस्ताद साळवे होय!’ असे विचार ज्येष्ठ व्याख्यात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४४व्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग आयोजित भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात अपर्णा कुलकर्णी बोलत होत्या. पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सुरेश विश्वकर्मा, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनाचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. अशोक नगरकर, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंगचे अध्यक्ष अनिल सौंदडे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, सामाजिक कार्यकर्ते नाथा शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश
मीठभाकरे, सतीश नागरगोजे, डॉ. हेमंत देवकुळे, अविनाश कांबीकर, क्रांतिवीर विचार मंचाचे श्रीयुत पाटोळे, योगेश लोंढे, तानाजी साठे, शिवाजी पौळ, ज्योती डोळस, गणेश कांबळे, सहभागी शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.



क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच केतन सांगडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या लहुवंदना आणि लहुप्रणामाला उपस्थितांनी साथ देत
समारंभाचा श्रीगणेशा करण्यात आला. शाहीर आसराम कसबे यांनी प्रास्ताविकातून क्रांतिगुरूंच्या जीवनावर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी राज्यसरकारने आर्थिक साहाय्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार अण्णा बनसोडे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सुरेश विश्वकर्मा यांनी लहुजी साळवे यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. अशोक नगरकर यांनी, ‘थोरांची जीवनचरित्रे वाचल्याने आपला राष्ट्राभिमान जागृत होतो!’ असे मत मांडले. भूमिका खंडागळे या विद्यार्थिनीने स्वरचित कवितेमधून लहुवंदना स्पर्धेचा अनुभव कथन केला; तर साक्षी मोहड या विद्यार्थिनीने लहुजी वस्ताद यांची वेषभूषा परिधान केली असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे :-
वैयक्तिक गट :-
प्रथम क्रमांक :- अनन्या काळबांडे (इयत्ता पहिली,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, मोहन नगर)
रोख ₹२१००/-
द्वितीय क्रमांक :- भूमिका खंडागळे (इयत्ता सहावी, खिंवसरा पाटील विद्यामंदिर, गणेश नगर, थेरगाव)
रोख ₹११००/-
तृतीय क्रमांक :- आरिफ शाह (इयत्ता आठवी, जय भवानी माध्यमिक विद्यालय, मोहननगर)
रोख ₹५००/-
उत्तेजनार्थ :-
आतिश कोळेकर (इयत्ता पाचवी,
सिटी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी)
सांघिक गट :-
प्रथम क्रमांक :-
खिंवसरा पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव
रोख रक्कम ₹१००००/-
द्वितीय क्रमांक :- जयवंत प्राथमिक शाळा,भोईरनगर
रोख रक्कम
₹५०००/-
तृतीय क्रमांक :- लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय लहु कन्या ग्रुप, थेरगाव
रोख रक्कम
₹२१००/-
उत्तेजनार्थ १ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, मोहननगर.
उत्तेजनार्थ २ :- क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, चिंचवडगाव.
उत्तेजनार्थ ३ :- खिंवसरा पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव इयत्ता दुसरीचा संघ
खुला गट :-
प्रथम क्रमांक :-
पूनम धुतडमल (केशरकाकू सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, बीड)
रोख ₹२१००/-
द्वितीय क्रमांक :-
प्रज्ञा अमित फुलपगार
(गावडेनगर, चिंचवड) रोख ₹११००/-
विजेत्यांना रोख बक्षिसांसह प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि लेखनसाहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच
महामेट्रोतील अभियंता सचिन आडागळे आणि आकुर्डीतील ज्येष्ठ महिला मंडळ या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि लेखनसाहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच उपस्थितांना लहुमुद्रा देऊन स्वागत करण्यात आले. ॲड. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी मोरे यांनी आभार मानले. कल्याणमंत्र पठणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.








