- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली सर्वधर्म, समभावाची शिकवण – शिवशाहीर दस्तगीर अजीज काझी यांचे प्रतिपादन
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डांगे चौक,थेरगाव येथील शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे शहरातील विविध भागात आयोजन करण्यात आले होते. या विचार पर्वात थेरगाव येथील डांगे चौकात शिवशाहीर दस्तगीर अजीज काझी यांचा “छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टीकोन व जीवन चरित्र ” यांचे कथन करणा-या पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी अजीज काझी यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट आपल्या पहाडी आवाजात गात उपस्थित नागरिकांची माने जिंकली. ते यावेळी बोलताना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सहकारी आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन होणार आहे. तर…
पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन आणि दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ०६ दिव्यांग वधू-वरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळा लिनिअर गार्डन गोविंद यशोदा चौक , पिंपळे सौदागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदाचे या विवाह सोहळ्याचे २ रे वर्ष होते. या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात , चि. जनार्दन पिराजी कोकाटे आणि चि.सौ.कां. अलका यादव वाळके , चि. मनोहर पांडुरंग गायकर आणि चि.सौ.कां. सोनाली वाल्मीक रसाळ , चि. अक्षय प्रभाकर शिंदे आणि चि.सौ.कां. मीनाक्षी पांडुरंग परदेशी , चि. लक्ष्मण धनाराम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सव वर्षपूर्तीबद्दल भारतीय संविधानाला सांगितिक महामानवंदना देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भारतीय संविधानाचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आदर्शवत ठरली आहे,’ असे गौरवाद्गार भारत सरकारचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रजासत्ताक दिनी दि. २६ जानेवारी रोजी ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यासाठी भव्य सांस्कृतिक विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नेपाळ देशासह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पास ‘नेट ॲप’ (Net App)कडून मिळालेला इनोव्हेशन ॲवॉर्ड, इम्पॉवरिंग बिझनेसेस थ्रू डेटा (Innovation Award, Empowering Businesses Through Data) हा ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ या श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार अंधेरी, मुंबई येथील जे. डब्ल्यू. मॅरियट सहार येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉंटी ऱ्होड्स यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘नेट ॲप’चे कार्यकारी संचालक व उपाध्यक्ष पुनीत गुप्ता व ‘नेट ॲप’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक क्रिश वितलदेवरा व विविध पुरस्कारार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवत असून स्वच्छता सर्वेक्षण २०२४ साठी महापालिकेने जोरदार तयारी केली असून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पालिका विविध सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रं १४ मधील खंडेराया भाजी मंडई, आकुर्डी येथे भाजी मंडई तसेच सार्वजनिक ठिकाणे व मुख्य चौकांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या स्वच्छता मोहिमेमध्ये खंडेराया भाजी मंडई व त्यापासून दोनशे मीटर अंतर भागात प्लेगेथॉन देखील घेण्यात आले. यावेळी भाजी मंडईतील व्यापारी व गिऱ्हाईकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था, त्यांचे नेतृत्व, स्वाभिमान आणि कष्ट करण्याची जिद्द आणि त्यांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असून स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, त्यांनी केलेला त्याग, समर्पण आणि त्यांचे विचार हे तरुण पिढीला आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत व्याख्याते योगेश सुपेकर यांनी मांडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधनपर्वाचे आयोजन चिंचवड, छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळील मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर मंगला कदम, साईकिरण मित्र मंडळाचे पदाधिकारी, सभासद यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण पिढीला सखोल मार्गदर्शन करताना ते म्हणाले,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द, आजही लोकांना प्रेरित करते. वीर शिवाजी महाराज त्याची चिकाटी, शौर्य आणि वर्चस्व हे त्याच्या नंतर येणाऱ्या सर्वांसाठी एक उदाहरण…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ ‘जय भवानी, जय शिवराय!’, ‘नमो पार्वती पते, हर…हर.. महादेव’… या घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी ‘एडीटी’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक विद्यालय केशवनगर भाग शाळा रावेत येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि 21 फेब्रुवारी रोजी सुरू होत असलेल्या एसएससी बोर्ड 2025 च्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाच्या व सदिच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समोर येता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या शाळेविषयी असलेल्या जुन्या सर्व आठवणींना उजाळा देत प्रत्येक शिक्षकाचे अनुभव, सर्व विद्यार्थ्यांशी सांगत अभ्यास करणे किती महत्त्वाचा आहे ? आम्ही सर्वजण येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे जास्तीत जास्त गुण मिळू याबाबत त्यांनी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना आश्वासित केले. भाषण करत असताना त्यांच्या एका डोळ्यामध्ये आनंद तर…
