- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे नववे वर्ष मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू असून यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी ३,६०० हून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मिळकत, पाणीपट्टीमध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाचा ६ हजार २५६ कोटी रुपयांचा मूळ तर, केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ९ हजार ६७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज (दि. 21) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादर केला. प्रशासकीय राजवटीतील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. आर्थिक स्थिरता, स्मार्ट प्रशासन, प्रगत शिक्षण, हरित सेतू, सिटी सेंटर, क्लायमेट बजेट, नागरी सूचनांचा सहभाग घेऊन विकास, पायभूत सुविधा सक्षमीकरण भर, सामाजिक समता, शाश्वत हवामानास अनुकूल विकास असे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये असणार आहेत. आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, पर्यावरण अशा पायाभूत सक्षमीकरणावर भर दिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज सोमवार दिनांक १७/0२/२०२५ रोजी एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२५ ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस शुभेच्छा देण्यासाठी शुभ चिंतन कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नितीन कोंढाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. व महात्मा.फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले . कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित अतिथिगणांचा विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ स्वाती…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘युवकांनी शिवरायांना आदर्श मानायला हवे!’ असे प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्याख्याते सिद्धनाथ घायवट जोशी यांनी वाकड येथे व्यक्त केले. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते. आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करीत घायवट जोशी पुढे म्हणाले की, ‘आजची प्रगल्भ युवा पिढी ही शिवाजी महाराजांची तथा तत्कालीन मावळ्यांची व्यक्तिरेखा आपल्या स्वतःमध्ये रुजवू पाहत आहे आणि ही गोष्ट खरोखर आनंदमयी आहे; परंतु शिवाजी महाराजांसारखे किंवा मावळ्यांसारखे दिसण्यासाठी दाढी, बाळी, चंद्रकोर या सर्व गोष्टींचे अनुकरण करण्याऐवजी शिवरायांचे आचारविचार मनामध्ये बिंबवणे हे अत्यंत गरजेचे आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कारखानदारी, लघुउद्योग ही पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख ओळख आहे. या उद्योग क्षेत्राचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. उद्योग, उद्योजक यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ‘‘ॲक्शन प्लॅन’’ बनवण्यात येईल. शहरातील लघु उद्योजकांवर अतिक्रमण कारवाई होणार नाही, असा विश्वास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर, महापालिका उपायुक्त मनोज लोणकर, क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, फ क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, प्रकाश गुप्ता, गोरख भोरे उपस्थित होते. आमदार लांडगे म्हणाले की, कुदळवाडी-चिखली येथील अतिक्रमण…
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरातील अंध, दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशील जीवनाचे दर्शन घडवण्यात आले. आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन चित्रपटगृहात बुधवार, दि. १९ रोजी हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. शिवरायांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनदेखील संघर्ष आणि बलिदानाने भरलेले आहे. त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी…
लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोणावळा नगरपरिषदेत दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी आढावा बैठक पार पडली. लोणावळा शहरातील मुख्य प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी साहेबांकडे बैठक लावण्यात आली होती. सदर बैठकीत सूचना करून देखील नगरपरिषद प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम १० मार्च पर्यंत सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जर मुदतीत काम सुरू झाले नाही तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार असल्याचे देखील सांगितले. त्याचप्रमाणे खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या जागा मालकांना तत्काळ उर्वरित पैसे देऊन जागा ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. यामध्ये कोणतेही राजकारण अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांना सांगितले. लोणावळा शहराचा पर्यटन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डीतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. प्राधिकरणाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त किरणकुमार काकडे यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.एन. पाटील, कार्यकारी अभियंता कांडगावे, पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व नवनिर्वाचित आमदार व संघाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ फेब्रुवारी 2022 रोजी सायं ६ वा. सावरकर सदन, सेक्टर २५ निगडी प्राधिकरण याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, अनुप मोरे (प्रदेशाध्यक्ष, युवा भाजपा महाप्रदेश), निखिल लातुरकर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी, समाज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय इंद्रायणीनगर ,भोसरी, पुणे .येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण विभाग आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे १७/०२/२०२५ ते २०/०२/२०२५ या कालावधीमध्ये आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .अशोककुमार पगारिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले . दि.१७/०२/२०२५ रोजी प्रथम पुष्पासाठी डॉ. स्वाती गानू उपस्थित होत्या ,त्यांचा विषय “युवा स्पंदन” या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले ,त्यात त्यांनी ‘व्यक्तिमत्व रंगावर नाही तर अंतरंगावर अवलंबून असते’ असा हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर १८/०२/२०२५ रोजी द्वितीय पुष्पासाठी डॉ. पांढरमीसे प्रकाश सर उपस्थित होते. त्यांचा विषय “मोबाईलच्या विख्यात…
