Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गावात गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी ‘श्री समर्थ ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्षम नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे आणि उत्तमराव कुदळे यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये माजी नगरसेवक रंगनाथशेठ कुदळे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ कुदळे, गुलाबराव सोनवणे, सुनील कुदळे, दत्तात्रय बाणेकर, अनिल कुदळे, प्रकाश बाणेकर, आनंद कुदळे, नंदू कुदळे, चारुदत्त मोहिते आणि कैलास सोनवणे यांचा समावेश होता. या नव्याने सुरू झालेल्या रुग्णवाहिकेमुळे पिंपरी परिसरातील नागरिकांना २४ तास तत्पर आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सुविधा, आईस बॉक्स तसेच…

Read More

पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – तृतीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सादर केलेल्या श्री स्वामी समर्थ आणि मांदियाळीतील सत्पुरुषांवरील भक्तिगीतांनी श्रोते स्वामीमय झाल्याची अनुभूती (बुधवार, दिनांक १८ मार्च) श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे सर्व उपस्थितांना आली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील तृतीय पुष्प पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून गुंफले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे. तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार असून, शास्त्रीय गायन, वादन, नाट्यसंगीत आणि नृत्य यांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा : २० मार्च रोजी सायंकाळी  ‘स्वराभिषेक’ या संकल्पनेतून नाट्यभाव भक्ती संगीताची…

Read More

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या हस्ते गुढीपूजन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  श्री गणेश नामाचा जयघोष…फुलांची आकर्षक आरास…रांगोळीच्या पायघड्या…बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढीपूजन करीत गुढी उभारण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे सविस्तर तक्रार सादर करत या प्रकल्पातील निविदा प्रक्रिया आणि खर्चाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप केले आहेत. भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली जागा आणि त्यानंतर करण्यात आलेले बदल यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात करण्यात आलेल्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून, नियोजनातील त्रुटींमुळे पुन्हा बदल करावे लागल्याने आर्थिक नुकसान वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, पुतळा उभारणीसारख्या विशेष कामासाठी आवश्यक असलेली तांत्रिक पात्रता आणि अनुभव असलेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, तसेच ही सेवा सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत लंगोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, मुंबई, अंबरनाथ आणि कोल्हापूर महापालिकांच्या हद्दीत मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च संबंधित महापालिका प्रशासनाकडून उचलला जातो. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही अशी योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड, गॅस तसेच दफनासाठी लागणारी जागा आणि खड्डा खोदण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. पिंपरी-चिंचवडमध्येही हिंदू,…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पद्मपाणी फाउंडेशन आयोजित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ (टिंबर मार्केट) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास भदंत हर्षबोधी महाथेरो, आंतरराष्ट्रीय धम्म प्रसारक मा. गगन मलिक, पुणे मनपाचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बिमलेंद्र कुमार आणि पुणे मनपाचे माजी उपमहापौर डॉ.…

Read More

पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – प्रथम पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील प्रथम पुष्प गुंफताना गायक, संगीतकार अवधूत गांधी आणि सहकारी यांनी श्रोत्यांना भक्ती – शक्तिगीतांची सुरेल अनुभूती सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड) चिंचवडगाव येथे दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, खजिनदार गणपती फुलारी, सहसचिव मीनल देशपांडे, सदस्य शंकर बुचडे,…

Read More

शनिवारी पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणारे “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, (दि.२१ मार्च) सकाळी १० वाजता, आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात होणार आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी पीसीइटीचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख…

Read More

पिंपळे गुरव,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर ” डोळे ठेवा निरोगी खा! आंबा , पपई, गाजर, कोबी..” हे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप नन्नवरे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सौ . संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे सहभागी झाले होते. याप्रसंगी गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, पंकज पाटील, महंमद शरीफ मुलानी, बाळासाहेब साळुंके,संजय गमे, गजानन धाराशिवकर, पांडुरंग…

Read More