Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ काशीद पार्क यांच्यावतीने आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत “गाडगेबाबा” यांच्या 149 व्या जयंती निमित्त संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर काशीद पार्क व बीआरटी रोड येथे स्वच्छता अभियान राबविले. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/ अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण पवार आपल्या सहकाऱ्यांसह स्वच्छता अभियानात भाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी राहुल ओव्हाळ व इतर स्वच्छता कर्मचारी यांनी या कामी उत्तम सहकार्य केले. यावेळी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्णा फिरके बोलताना म्हणाले काशीद पार्क मध्ये 2016 च्या जुन्या नावीन्यपूर्ण…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवनाथडी जत्रा ही केवळ जत्रा नसून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक उत्सव आहे. महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण गायकवाड यांनी केले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चार दिवसीय जत्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेते किरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या जिन्याच्या भिंती विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांनी सजल्या आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी या चित्रांची पाहणी करीत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे व असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने नुकतीच ‘कॅनव्हास ऑफ क्युरिऑसिटी’ हा चित्रकला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात आकांक्षा फौंडेशनच्या पाच शाळांसह महानगरपालिकेच्या ३४ शाळांनी सहभाग घेतला होता. चित्रकला मेळाव्यात २९० विद्यार्थ्यानी ४० शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध चित्रांचे रेखांटन केले. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी विविध विषय तसेच चित्रकलेचे साहित्य देण्यात आले होते. यामध्ये ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘माझे गाव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम पिंपरी ते निगडी या मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असून, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प काम बंद करण्यात यावे रात्री मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या ड्रिल मशीन ने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यामुळे खुप मोठा आवाज येत असून, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीची झोप मोड होत असते. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी नीट अभ्यासही करता येत नाही ना नीट झोप घेता येत. नाहक त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आजूबाजूला रुग्णालय, नागरी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग्रामसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या लोहाराचा महिमा कथन करणारे कविसंमेलन चक्क लोहाराचा भाता हलवित त्याच्या प्रज्वलित भट्टीच्या साक्षीने बालाजी फॅब्रिकेशन, डांगे चौक, थेरगाव येथे शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी अतिशय रंगतदार झाले. शब्दधन काव्यमंच आयोजित “लोहार रे आळवितो…” या शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांनी भूषविले; तर हिंदी – मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक जितेंद्र रॉय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोहारकामातील ऐरण, भट्टी, भाता, घण या सामुग्रीचे विधिवत पूजन करून तसेच शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांनी गायलेल्या “लोहार रे आळवितो…” या स्वरचित भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील 25 वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांसाठी व टपाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उपटपाल कार्यालय पुणे स्टेशन येथील मुख्य कार्यालयाअंतर्गत जोडली होती. त्यामुळे शहरातील 35 उपटपाल कार्यालयांचा कार्यभार पुणे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेशित करण्यात येत होता. टपाल कार्यालयासाठी लागणारे पैसे पुणे कार्यालयातून पोहोचवले जात होते. त्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वास्तू रचनाकाराला आपल्या उद्योग व्यवसायात नाव कमवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या खडतर प्रवासामध्ये अनुभव घेऊन नवीन वास्तू उभारणीमध्ये कौशल्य वापरून मूर्त स्वरूप देण्याचे कार्य करता येते. यातून मिळणारे समाधान अमूल्य असते. अनुभव घेत गेलात की काही वर्षांनंतर वास्तुरचनाकाराला स्थैर्य, समृध्दी, संपन्नता येते. त्यातून अमर्याद संधी उपलब्ध होतात असे मार्गदर्शन आयआयएचे अध्यक्ष आर्किटेक्ट विकास आचलकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पीसीईटी संचालित निगडी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय (२१, २२ फेब्रुवारी) दशकोत्सव एक्झिबिशन आणि शोकेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वरश्री संगीत महोत्सवाची पहिल्या दिवसाची सुरुवात नामदेव शिंदे यांनी सादर केलेला राग पुरिया, अंजली शिंगडे – राव यांनी व्हायोलिनवर सादर केलेला राग भीमपलास आणि उस्ताद अर्षद अली यांनी राग मारू बिहागने रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली. स्वरश्री फाउंडेशनच्या वतीने औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित स्वरश्री संगीत महोत्सवाचे प्रथम पुष्प नामदेव शिंदे यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यामध्ये प्यार दे गर लागी हा बडा ख्याल, तर घडी ये गिनत जात, हा छोटा ख्याल सादर केला. तसेच ‘लय नाही लय नाही मागणे’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाणे गायनाची सांगता केली. रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महाराष्ट्रातील कामगारांचे जीवन धोक्यात असून राज्यातील अवैध वाळू वाहतूक तसेच निष्काळजीपणाचा कळस म्हणजे जालना जिल्ह्यातील झालेली दुर्घटना होय , दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी झोपलेल्या निष्पाप कामगारांच्या अंगावरती अवैध वाळू टिपरने टाकली गेली आणि त्याखाली दबून मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या वारसांना १० लाख रुपये अर्थसहाय्य करावे तसेच यात ठेकेदार ,ट्रकचालक दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे आज केली. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे निवेदनात म्हटले आहे की पिसोळी चांडोळ रस्ता तालुका जाफराबाद,जिल्हा जालना रस्त्यावरिल पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या राहण्याच्या पत्र्याचे शेडवर मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील तब्बल २० लाख लाभार्थींना मंजुरीपत्रांचे वितरण तसेच १० लाख लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. मावळ पंचायत समितीत ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात मावळातील १६०२ लाभार्थी कुटुंबांना मंजुरीपत्राचे वाटप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते पार पडला.  यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, बाळासाहेब मतकर यांसह इतर अधिकारी वर्ग, लाभार्थी व स्थानिक…

Read More