- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दीड महिन्यापासून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे युवक पदाधिकारी मंगेश असवले यांनी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन जाब विचारला आणि तातडीने कारवाईची मागणी केली. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुले, महिला, वृद्ध आणि दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात बाधित होत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तमारा सोसायटी गेटजवळील कचरा आणि फुटपाथवरील अनधिकृत पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्यात यश आले असून, परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान विभागाचे सहायक आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कांबळे आणि श्री. दरोडे सर यांच्या नेतृत्वात ही महत्त्वपूर्ण कृती पार पडली. या उपक्रमासाठी तमारा सोसायटीच्या रहिवाशांनी प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत. याआधी परिसरात नियमितपणे कचरा टाकला जात होता तसेच अनधिकृत पार्किंगमुळे रहिवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्येच्या निवारणासाठी सोसायटीच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, महापालिकेच्या विशेष मोहिमेअंतर्गत परिसराची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात सर्वात मौल्यवान “वेळ” आहे. ज्याला वेळेचे महत्व कळले तो यशस्वी होतो. त्यामुळे सर्वांनी वेळेचे महत्व जाणून योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा व आलेल्या संकटावर मात करीत पुढे गेले पाहिजे. आदिवासी वाडी, वस्तीवर सेवा, सुविधा कमी असताना देखील परिस्थितीशी लढा देऊन आपल्या पायावर ठामपणे उभे राहिलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी तालुक्यात, शहरात व्यवसाय, रोजगार निमित्त स्थायिक झाल्यानंतर पुन्हा मागे वळून गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे असे मार्गदर्शन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय घोडेगाव संचालित शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कला व…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरूवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये “युवोत्सव २०२५” या आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.२७) सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. १ मार्च) मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. युवोत्सव स्पर्धेच्या आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट या स्पर्धांचा समावेश आहे. युवोत्सव क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे परिसरातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयामधील संघ सहभागी होणार आहेत.…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगच्या (एमआयटी एसओसी) विद्यार्थ्यांनी हॉरीझॉन एआय हॅकेथॉन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत, “सिकल सेल डिटेक्टर” या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी मधुर पाटील, अनुराग अहिरराव, अर्णव बुळे आणि निधी फोफळीये यांचा समावेश असलेल्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत तब्बल १००० डाॅलर्सचे पारितोषिक जिंकले आहे. “सिकल सेल डिटेक्टर” हा एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित उपाय असून, जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विशेषतः दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुभाष महाजन यांची सून मोनिका संदीप चित्तेवार ( महाजन ) यांनी सायबर क्राईम ब्रँच पिंपरी चिंचवड पुणे.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व तसेच पोलीस आयुक्तालया मधील, पोलीस दलातील असंख्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच आज पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आम्ही गार्डन ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्यांच सत्कार करण्यात आला . याप्रसंगी गार्डन ग्रुपचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर मलशेट्टी खजिनदार बापूसाहेब जाधव, विलास गावकर, कॅप्टन तारा अंजन, शरीफ इफ्तकारी,ताजुद्दीन भाई तांबोळी, ज्ञानेश्वर मोरे,अल्ताफ भाई शेख, मिट्टू…
नवी सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती प्राध्यापिका कमल अरुण पाटील यांचे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांनी जळगाव आकाशवाणी केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण महिलांसाठी स्वतः लिखाण करून ५००हून अधिक कार्यक्रम सादर केले होते. बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित ‘खानदेशाची लोकधारा’ या कार्यक्रमाचे संहितालेखन त्यांनी केले होते. सुमारे पन्नास कलाकारांसह बहिणाबाईंची मुख्य भूमिका स्वतः सादर करून त्यांनी हा कार्यक्रम अजरामर केला. ‘खानदेशची लोकधारा’ बरोबरच ‘मी श्यामची आई बोलते’ हा एकपात्री प्रयोग तसेच व्याख्यान, कथाकथन, काव्यवाचन आणि स्फुटलेखन अभिवाचन यांचे त्यांनी महाराष्ट्रभर प्रयोग केले होते. तीस वर्षे त्यांनी कार्यक्रमांमधून निवेदन केले. लेवा गणबोलीतील त्यांचे…
शिवशंभो व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘नागरिकांनी देशाचे डोळे आणि कान बनावे!’ असे आवाहन सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी शिवशंभो मंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘भारतापुढील संरक्षणाची आव्हाने’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना हेमंत महाजन बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक बजरंग गडदे, व्याख्याते राजेंद्र घावटे, कामगारनेते सुजीत साळुंखे, भास्कर रिकामे, सदाशिव पाटील, साहेबअण्णा गोविंदे, रामदास जाधव आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, ”जेथे शुद्ध आचार, विचार आणि कृती, तेथे देवाची प्रचिती’ हे ब्रीद घेऊन शिवशंभो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत असताना त्या ठिकाणी पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर खड्डे खोदताना पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असून त्या संदर्भात…
