तमारा सोसायटी गेटजवळील कचऱ्याचा प्रश्न सुटला


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तमारा सोसायटी गेटजवळील कचरा आणि फुटपाथवरील अनधिकृत पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्यात यश आले असून, परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.


स्वच्छ भारत अभियान विभागाचे सहायक आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कांबळे आणि श्री. दरोडे सर यांच्या नेतृत्वात ही महत्त्वपूर्ण कृती पार पडली. या उपक्रमासाठी तमारा सोसायटीच्या रहिवाशांनी प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

याआधी परिसरात नियमितपणे कचरा टाकला जात होता तसेच अनधिकृत पार्किंगमुळे रहिवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्येच्या निवारणासाठी सोसायटीच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, महापालिकेच्या विशेष मोहिमेअंतर्गत परिसराची स्वच्छता करून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे कचरा टाकण्यावर आळा बसेल आणि परिसर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित राहील.
तमारा सोसायटी रहिवासी संघाच्या वतीने महापालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राखण्यासाठी सर्व रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










