- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तांवर माहे डिसेंबर २०२४ ते माहे फेब्रुवारी २०२५ या दरम्यानच्या कालावधीत आज अखेर तब्बल ८७७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत जप्त करण्यात आलेल्या ७५९ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तापैकी ३२१ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची संपूर्ण थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केल्याने जप्त केलेल्या त्यांच्या मालमत्ता मुळ मालकाच्या ताब्यात देणेत आल्या आहेत. उर्वरित ४३८ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची यादी लिलावाचा भाग म्हणून दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजीचे दै.सकाळ, दै. महाराष्ट्र टाईम्स, दै. लोकमत, दै. लोकसत्ता, दै. आज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नियमबाह्य कारभार करणाऱ्या बेजबाबदार शाळांवर कारवाईची मागणी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक वर्ष 2025 – 26 सुरू होत आहे, मागील काही घटना पाहता शहरात अनेक शाळा ह्या बेकायदा आणि अनधिकृत कारभार करणाऱ्या असलेल्या यापूर्वीच आढळल्या गेल्या आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शाळांची प्रशासकीय पारदर्शकता पडताळणी साठी मागील आठ-दहा महिन्यांपासून सातत्याने पाठ पूरावा करत असणारे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी याबाबत पत्राद्वारे सविस्तर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. महा शिबिराचे मुख्य संयोजक व पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी ही माहिती दिली. शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मोफत सेवा : – मोफत कॅन्सर तपासणी – मोफत X-Ray – मोफत सोनोग्राफी – मोफत सर्व रक्त तपासण्या – मोफत डायलिसीस आणि उपचार – दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व आवश्यक…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य, पर्यटन, क्रीडा, पाणीपुरवठा आणि महामार्ग विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आरोग्य सुविधांसाठी तत्काळ निधी मंजूर कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, लोणावळा उपजिल्हा रुग्णालयातील फर्निचर, मेडिकल उपकरणे, गॅस पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुविधांसाठी पुरवणी मागणीत समावेश करून तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. आई एकविरा देवीसाठी फनिक्युलर रोप वे आणि…
पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर होणारी वाहतुक कोंडीबाबत विविध विभागांनी आपले मत नोंदविले. त्यानुसार या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागात पुढील ३० दिवसात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंगळे सौदागर आणि रहाटणी मधील वाचनप्रेमी नागरिकांनी या पुस्तक वाटपाचा लाभ घेतला. या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे म्हणाले , “मराठी वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कटीबद्ध आहे त्याचाच एक भाग म्हणून 5000 हून अधिक पुस्तकांचा संग्रह असलेले विठाई वाचनालय उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे मोफत चालवले जाते. आज , मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने कवी कुसुमाग्रजांचे स्मरण करताना , याच वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामशेत येथील रिक्षा चालकांनी एकत्रित येऊन हिंदवी स्वराज्य रिक्षा स्टँडची स्थापना केली याचा आनंद आहे. मावळचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यांचा आदर्श घेऊन रिक्षा चालकांनी स्टँड सुरू केले आहे. हे कौतुकास्पद आहे. रिक्षा चालकांनी शिवछत्रपतींचे विचार रुजविण्यासाठी काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. कामशेत येथील मुख्य चौकामध्ये हिंदवी स्वराज्य रिक्षा स्टॅंडचे उद्घाटन बाबा बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. अमर चौरे, ग्रामपंचायत समिती सदस्य नीलेश दाभाडे. मावळ तालुक्याचे कार्याध्यक्ष अनिल गायकवाड. ज्येष्ठ सल्लागार संजय कुलकर्णी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – युवा हे सामाजिक परिवर्तनासाठी एक महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. सामाजिक दबाव, पारंपरिक अपेक्षा आणि जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य युवकांमध्ये असते. नव्या पिढीने आत्मविश्वासाने पुढे येत सामाजिक समस्यांना नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी नेतृत्वगुण विकसित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतील. युवकांनी नवे विचार नव्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक हितासाठी योगदान द्यावे. नव्या पिढीतील सर्जनशीलता आणि ऊर्जा समाजाला अधिक प्रगत न्याय आणि सशक्त बनविण्यास मदत करू शकते. परंतु हे सर्व करण्यासाठी प्रथम स्वतःला सक्षम व्हावे लागेल. देशातील युवक सक्षम झाला तरच देश सक्षम होईल असा कानमंत्र आमदार…
शिवशंभो व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘जगण्याच्या आनंदी वाटा’ या विषयावरील अंतिम पुष्प ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी चिंचवड येथे गुंफले. ज्येष्ठ उद्योजक भगवान पठारे, कुशल पाटील, कामगारनेते विलास सपकाळ, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर फड, राजीव राऊत आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांची याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. फाउंडेशनचे सचिव राजेश हजारे यांनी प्रास्ताविकातून, ‘२००३ पासून शिवशंभो व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. समाजप्रबोधन करीत असताना मानवी जीवनातील हास्यरसाचे महत्त्व ओळखून प्रतिवर्षी हास्यविनोदाचा परिपोष करणारे किमान एकतरी व्याख्यान आवर्जून आयोजित केले जाते!’ अशी माहिती दिली.…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देखील शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मंगळवारी (२५ फेब्रुवारी) महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सर्व रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छता मोहीम यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. या दौऱ्यात महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर यांच्यासह संबंधित रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व रुग्णालयातील सेवासुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असून, तसेच या ठिकाणी…
