मराठी पुस्तकांचे वाटप करून , उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मराठी राजभाषा दिन साजरा


पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंगळे सौदागर आणि रहाटणी मधील वाचनप्रेमी नागरिकांनी या पुस्तक वाटपाचा लाभ घेतला.


या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे म्हणाले , “मराठी वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कटीबद्ध आहे त्याचाच एक भाग म्हणून 5000 हून अधिक पुस्तकांचा संग्रह असलेले विठाई वाचनालय उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे मोफत चालवले जाते. आज , मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने कवी कुसुमाग्रजांचे स्मरण करताना , याच वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही अग्रनामांकित मराठी साहित्य वाचक प्रेमींमध्ये वाटप आहोत.”

यानिमित्ताने , श्री.सखाराम ढाकणे म्हणाले , “मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकमान्य टिळक, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे यांसारख्या महान व्यक्तींनी मराठीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. आजच्या डिजिटल युगात इंग्रजी आणि इतर भाषांचा प्रभाव वाढत असताना, आपण मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठीतून विचार मांडणे, लेखन करणे आणि तिचा प्रचार व प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे.”
याप्रसंगी , डॉ सुभाषचंद्र पवार, रमेश वाणी, सखाराम ढाकणे अनिल कुलकर्णी, बाळकृष्ण चौधरी , रमेश चांडगे, रमेश जावळे, प्रा शिवाजी पाटील यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लबचे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थ आणि परिसरातील साहित्य प्रेमी नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.










