Author: maharashtrabreakingnews.com

“संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांचे प्रतिपादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत परंपरेने चालविलेल्या मराठी भाषेत जात,धर्म,वंश, प्रांत अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद नाही,संघर्ष नाही;ती परतत्वाला स्पर्श करणारी अभिजात भाषा आहे.त्यामुळे ठामपणे सांगता येईल की,संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली.”असे प्रतिपादन प्रवचनकार ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांनी केले. गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा पाचवा वर्धापन दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात ते बोलत होते.बिना इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी येथे संपन्न झालेल्या या संमेलनात साहित्यिक राज अहेरराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के,शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक,विधीज्ञ दिलीप सातपुते,विधीज्ञ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सव २०२५ची सांगता शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे दिगंबर राणे आणि सहकारी प्रस्तुत ओंकार संगीत संध्या या भक्तिसंगीताच्या मैफलीने गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अतिशय रंगतदार झालेल्या या मैफलीत दिगंबर राणे, वंदना रावलल्लू, तानाजी पाटील, मनीषा रेवाणकर या गायक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाचा परिपोष केला. विशेषत: “कानडा राजा पंढराचा…” , “ओंकार स्वरूपा…” , “निघालो घेऊन दत्ताची पालखी…” , “जय गंगे भागीरथी…” , “शंभो शंकरा…” , “हे भोळ्या शंकरा…” , “ओम नम: शिवाय…” या गीतांनी भाविकांची मने जिंकली. मैफलीत तानाजी पाटील (हार्मोनियम), नारायण जगताप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घरापासून मेट्रो स्‍टेशन पर्यंत येण्यासाठी नागरिकांना शेअर रिक्षाद्वारे रिक्षा चालकांकडून सेवा दिली जाईल. त्‍यासाठी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करणार आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्‍टेशनपर्यंत कनेक्‍टीव्‍हिटी सुलभ होण्यासाठी रिक्षा चालक पुढाकार घेतील, असा सकारात्‍मक प्रतिसाद महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला. पुणे मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेची बैठक पार पडली. पुण्यात पार पडलेल्‍या या बैठकीत मेट्रो स्‍टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना रिक्षा चालकांनी सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे, शहराध्यक्ष मोहंम्‍मद शेख, सचिव अविनाश वाडेकर आदी या वेळी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मध्यावधी (Mid Term) आढावा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ राज्य व क्षेत्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे आयुक्त शेखर सिंह यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महानगरपालिका…

Read More

शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर चिंचवड येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. अभिजात मराठी भाषेचा इतिहास, साहित्य, महत्व आणि संवर्धन या विषयावर विविध वक्त्यांनी माहिती सांगत भाषेच्या गौरवपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला. याप्रसंगी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भरत गायकवाड, अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष व व्याख्याते राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, गणेश सहाणे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ, महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि वाचक वर्ग उपस्थित होता.

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शब्द, शस्र आणि वाणीने परकीय सत्तेला जबरदस्त हादरे दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतीकारकांना त्यांच्या कार्यातून स्फुर्ती मिळाली. म्हणून सावरकर हे क्रांतिकारकांचे मेरूमणी ठरतात. सावरकर म्हणजे राष्ट्राचे सदैव चिंतन करणारा धगधगता अग्निकुंड ! घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी केलेला त्याग अवर्णनीय असाच आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानातील स्मारकात सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत “स्वातंत्र्यसूर्य सावरकर” या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ अधिकारी विनायक थोरात उपस्थित होते. घावटे पुढे म्हणाले की, “सावरकरांवर केवळ राजकीय हेतूने…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, मराठी विभागप्रमुख प्रा. स्वप्ना जानूनकर, प्रा. तनुजा ववले, सुषमा शिरावले, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, मंजुषा भाग्यवंत शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित…

Read More

उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक – प्रदिप जांभळे पाटील पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल; पण यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या कार्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे; याची माहिती असली पाहिजे. जबाबदारीने व्यवस्थापन केले तर आपण आपल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘युवोत्सव २०२५’ या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.२७ फेब्रुवारी) सोनाली कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. जे.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांनी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने केलेल्या कार्यालयीन कामकाजामुळे महापालिकेचे काम उत्तम पध्दतीने पार पडले आहे या त्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे फेब्रुवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या ११ आणि स्वेच्छानिवृत्ती होणाऱ्या २ अशा एकुण १३ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अरूण दगडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचा काळ आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. यात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असून मराठी भाषा संस्कृती जोपासणारी ज्ञानभाषा आहे. या भाषेला व्यावहारिक भाषेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास युवा शक्तीला रोजगाराच्या अनेक संधीचे दालन खुले होऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मराठी भाषेची संस्कृती जागवणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना…

Read More