अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, मराठी विभागप्रमुख प्रा. स्वप्ना जानूनकर, प्रा. तनुजा ववले, सुषमा शिरावले, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, मंजुषा भाग्यवंत शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कथा, कविता व नाट्य सादरीकरण केले.
तसेच लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य केले. तसेच ही मायभूमी हे समूहगीत सादर केले. त्याचबरोबर सामूहिक नृत्य करून मराठी भाषेचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात ग्रंथपालखी काढली. मराठी भाषेची महती सांगणारे नाटक ‘केया टिचर आणि टायगरचे पालक’ सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी मराठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षकांनी देखील सहभाग घेऊन अनेक जुन्या मराठी गीतांना उजाळा दिला.
आरती राव यांनी मराठी भाषेचे महत्त्व, मराठीचा वारसा, मराठी बाणा विद्यार्थांना सांगून सांस्कृतीक वारसा जपण्याचे आवाहन केले. प्रणव राव यांनी मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो; वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्य संपदेविषयी विद्यार्थांना माहिती दिली. तसेच मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्याबद्दल माहिती सांगितली. आपल्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्ना जानूनकर, शिक्षिका प्रिती पितळे, शिक्षिका मंजुषा भाग्यवंत, अश्विनी शिसोदे यांनी, तर आभार प्रा. हर्षदा वाजे यांनी मानले.










