Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा महिला दिनाचे औचित्य साधून गणेनगर ज्येष्ठ नागरिक संघ थेरगावच्या वतीने ,सामाजिक,राजकीय,क्रीडा ,वैद्यकीय,पत्रकारिता,मानवी हक्क, सांप्रदायिक, क्षेत्रातील 10 कर्तुत्ववान रणरागिणी महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये माया बारणे( राजकीय) करिश्मा बारणे (समाजसेविका )जयश्री श्रीखंडे (साहित्य) कुमुदिनी घोडके (कीर्तनकार) कु.आशा साळवे (पत्रकारिता) वृषालीताई मरळ (जेष्ट नागरिक) ,संगीता जोगदंड (मानवी हक्क) डॉ. निकिता पारगे (वैद्यकीय) कु, श्रावणी घाडगे (क्रीडा) सुप्रिया पारगे.(दामिनी पथक) या 10 रणरागिनीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘अधिकारी महिलांनी समाजातील उपेक्षित महिलांना न्यायाची आणि सन्मानाची वागणूक द्यावी!’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने महिला पोलीस कर्मचारी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनी यांचा प्रातिनिधिक सन्मान करताना कविता बहल बोलत होत्या. सोहम् ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कविता बहल पुढे म्हणाल्या की, ‘एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस खात्यात किरण बेदींसारख्या महिलांनी आपल्या कर्तबगारीने कर्तव्य अन् कर्तृत्वाचे नवीन मानदंड निर्माण केले आहेत. त्याचा आदर्श आताच्या कार्यरत…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराघात व बलाघाताचा योग्य ठिकाणी केलेला वापर आणि अभिनयासह केलेले वाचन म्हणजे अभिवाचन होय. स्वतःपासूनच दुरावण्याच्या या युगात आपल्या सर्वात जवळची व शाश्वत असलेली गोष्ट म्हणजे मराठी साहित्याचा ठेवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. संपत गर्जे यांनी केले. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून चिंचवडमधील मोरया शिक्षण संस्थेतर्फे राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. यावेळी आठव्या काव्यवाचन संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे, चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक गोपीचंद चाटे, मोरया शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शकुंतला माटे, संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे, खजिनदार रणजित सावंत, विश्वस्त…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा सेना प्रमुख श्रीकांत शिदे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख शिरुर लोकसभा तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, निलेश मुटके, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, युवासेना विधानसभा भोसरी प्रमुख…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. २०१७ मध्ये २८.७१ कोटींच्या निविदेने कामाला सुरुवात थेरगाव येथील प्रसून धाम हाउसिंग सोसायटीजवळून चिंचवड-थेरगाव जोडणाऱ्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामासाठी २०१७ साली धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही निविदा मूळ अंदाजपत्रकाच्या १४% अधिक दराने मंजूर करण्यात आली होती. वेळेवर काम न झाल्याने दोनदा मुदतवाढ मूळ निविदेनुसार ठेकेदाराला १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांची पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सातत्याने मागणी होत होती,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर पाण्याची टाकीमुळे या परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे तसेच सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, पाणी पुरवठा नियोजनबद्ध व्हावा, यासाठी पुढील काळातही महापालिकेने अशाच पद्धतीने नियोजन करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील जुन्या एल्प्रो कंपनीजवळ नव्याने उभारलेल्या २० लाख लिटरच्या पाण्याचे टाकीचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर अपर्णा डोके,मुख्य…

Read More

समाज विकास विभागाच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्या उषा मुंढे,अनुराधा गोरखे,अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला मोठ्या उपस्थित…

Read More

ह. भ. प. मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धन्य तुकोबा समर्थ I जेणे केला हा पुरुषार्थ II हेच वचन मनात ठेवून फुलांनी सजलेल्या पालखीत तुकोबांच्या चांदीच्या पादुका, टाळ – मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करीत हजारोंच्या उपस्थितीत देहू ते भंडारा डोंगर मार्गावर दिंडी सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. जगद्गुरु तुकोबारायांच्या पंचमवेद गाथा भांडारातील ज्ञानावर अध्यात्मिक पोषण झालेल्या वारकरी बांधवांकडून ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १७ मार्च २०२५ या दहा दिवसाच्या कालावधीत हे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च…

Read More

– महिलांच्या पुढाकाराने ऑटो मोबिलिटी क्षेत्रात जगभर प्रबोधन करणार : डॉ. एस. के. सरोज पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार : आशा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्य व पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष सौ आशा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वेहिकल ऑटो एक्जीबिशन 2025 सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या. या वेळी…

Read More

दोन दिवस झुंबा, लाईव्ह संगीत, सायकलींग,पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे,त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच पर्यावरणाला हानी पोहचत आहे.शहरात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पादचारी नागरिकांना देखील वाहतूक समस्या भेडसावत असते,या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नियोजन करून शहरात प्रथमच गजबजलेल्या पिंपरी बाजारपेठेत वाहन मुक्त दिवसाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे तसाच उपक्रम शहरातील इतर ठिकाणीही राबवावा असे प्रतिपादन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते शगून चौक आणि शगून…

Read More